ममता बॅनर्जींना जिवंत किंवा मृत पकडून देणाऱ्याला एक कोटीचे ‘बक्षीस’ ; टीएमसीच्या नेत्याला मिळालेल्या पत्राने ‘गोंधळ’

पश्चिम बंगाल : वृत्तसंस्था – ममता बॅनर्जी यांच्या बाबत मिळालेल्या पत्राने पश्चिम बंगालमध्ये वातावरण चांगलेच तापले आहे. एका टीएमसी नेत्याला एक पत्र मिळाले आहे त्यात टीएमसीच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांना जीवंत किंवा मृत पकडणाऱ्याला एक कोटी रुपये बक्षीस देण्यात येईल अशी घोषणा करण्यात आली आहे. सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार ही चिट्टी कोलकत्यातील टीएमसीचे नेते अनरूपा पोद्दार यांना घरी पाठवण्यात आली. ममता बॅनर्जींना मिळालेल्या धमकीची माहिती पोद्दार यांनी सेरामपूर पोलीस स्टेशनला दिली. पोलिसांनी चिट्टीची एक प्रत देखील सोपावण्यात आली आहे. सांगण्यात येत आहे की ही धमकी राजीव किल्ला नामक व्यक्तीने पाठवली आहे. त्यात तीन लोकांचे फोन नंबर देखील देण्यात आले आहे.

लोकसभा निवडणूक झाल्यानंतर भाजप आणि टीएमसीच्या नेत्यांनी अशा प्रकारच्या धमक्या देण्यात येत आहे. त्यामुळे पश्चिम बंगाल मधील वातावरण गढूळ झाले आहे.

धमकी देण्यात आलेल्या पत्रात ममता बॅनर्जीचे फोटो छापण्यात आले आहेत. आणि ममतांना राक्षस आणि जिहादी म्हणण्यात आले असून जे ममतांना जीवंत किंवा मृत पकडून देईल त्याला एक कोटी रुपये बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. असे पहिल्यांदाच झाले नसून ममतांना अशा प्रकराच्या बऱ्याचदा धमक्या आल्या आहेत.

लोकसभा निवडणूकीवेळी भाजप नेता साक्षी महाराज यांनी ममता बॅनर्जींना हिरण्यकश्यपच्या खानदानातील आहेत असे म्हणत वाद निर्माण केला होता. पश्चिम बंगालमध्ये यंदाच्या लोकसभेत भाजपला मोठे यश मिळाल्याने टीएमसी मध्ये नाराजी आहे. 42 पैकी 18 जागावर बंगालमध्ये भाजपला विजय मिळाल्याने भाजप आणि टीएमसीमध्ये बंगालात चांगलाच वाद सुरु आहे.

बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या देखील हत्या झाल्या आहेत. लोकसभेपासून भाजप कार्यकर्त्यांना देखील जीवे मारण्याच्या धमक्या येत आहे. यात भाजपला जास्त जागा मिळवल्यावर वाढ झाली आहे. भाजप आणि टीएमसीत सध्या वाद वाढत असल्याने राजकीय परिस्थिती गंभीर बनली आहे. त्या आता थेट ममता बॅनर्जींनाच जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने बंगालात राजकीय भूकंप आला आहे. यावर आता ममता बॅनर्जी काय करतात हे पाहणे योग्य ठरेल. 

You might also like