Letter Viral : जोडप्याच्या ‘मुक्त’ अन् ‘रंगेल’ रोमान्सच्या आवाजाने चवताळून परेशान झाले शेजारी, एकेदिवशी ‘त्यांनी’ चक्क दरावर चिठ्ठीच लिहीली

पोलीसनामा ऑनलाइन – एका जोडप्याचा रोमान्स करतानाच्या आवाजाने त्रस्त झालेल्या एका शेजा-याने तक्रार करणारी चिठ्ठी लिहून संबधित जोडप्याच्या दारावर चिकटवली. अतिशय सौम्य भाषेत अन् विनम्रपणे शेजा-याने त्यांच्या लक्षात ही गोष्ट आणून दिली. स्कॉटलंडच्या ग्लासगो शहरातील हे प्रकरण आहे. शेजाऱ्याने या जोडप्याला दिलेला सल्ला त्यांना लाजेने मान खाली घालायला लावणारा आहे.

स्टीपन कनिंघम (वय 26) यांच्या दरवाजावर चिकटविण्यात आली होती. एका अज्ञात शेजाऱ्याने खूपच सौम्य भाषेत अन् विनम्रतेने ध्वनी प्रवास करतो असे लिहिले होते. स्टीफनने सांगितले की, मी सकाळी उठल्यानंतर मला दारावर चिठ्ठी चिकटवलेली दिसली. मला ती चिठ्ठी पाहून हसावे की रडावे ते कळेनासे झाले. सुरुवातीला वाटले कुणीतरी जवळच्या व्यक्तीने माझी मस्करी केली असावी. मी हा किस्सा माझ्या मित्रांना सांगितला तेंव्हा त्यांनी मला शेजाऱ्यांना इअरप्लग खरेदी करण्याचा सल्ला देण्यास सांगितले आहे. ही चिठ्ठी कोणी लिहिली ते मला जाणूनही घ्यायचे नाही, असे त्याने म्हटले आहे.

शेजा-याने काय लिहले होते चिठ्ठीत
प्रिय शेजारी, तुम्हाला काहीतरी लक्षात आणून देण्यासाठी ही चिठ्ठी लिहत आहे. या इमारतीच्या भिंती पातळ असून त्यातून आवाज प्रवास करतो. तुमच्या चार भिंतीमधील खास आणि खासगी क्षणांना आमच्यासोबत सार्वजनिक करू नका. आम्ही तुम्हाला यासाठी विनम्रतेने विचारत आहोत, की तुम्ही रात्री थोडा कमी आवाज करू शकता का. कृपया लक्षात ठेवा, काळजी घ्या, कारण तुमच्या शेजारच्यांच्या घरात तुमचा ध्वनी प्रवास करतोय असे पुढे लिहले होते.