LG ची K सीरिज लॉन्च, स्मार्टफोनमध्ये असणार 4 कॅमेरे, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एलजीने आज LG K61, LG K51S आणि LG K41S आपली के सीरिज अंतर्गत तीन स्मार्टफोन लाँच केले आहेत. तिन्ही फोनमध्ये यूएसबी टाइप – सी पोर्ट आणि स्टोरेज वाढवण्यासाठी मायक्रोएसडी स्लॉट देण्यात आला आहे. तिन्ही फोनमध्ये क्वॉड रियर कॅमेऱ्याचा सेटअप, ६.५ इंचाचा डिस्प्ले आणि ४००० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. फोनमध्ये रियर फिंगरप्रिंट स्कॅनर सह MIL-STD 810G सपोर्ट करते. या फोनच्या बॅकला ४८ मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि सेल्फीसाठी व व्हिडिओ कॉलिंगसाठी १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.

अद्याप कंपनीने LG K61, LG K51S आणि LG K41S ची किंमत किती असणार आहे, याविषयी काहीही माहिती सांगितली नाही. हे तिन्ही फोन सर्वात आधी अमेरिकेत उपलब्ध होणार आहेत. वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत हे फोन खरेदी करता येऊ शकतील, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. LG K61 ला टायटेनियम, व्हाइट आणि ब्लू रंगात उपलब्ध करण्यात येणार आहे. LG K51S ला पिंक आणि ब्लू या दोन रंगात तर LG K41S ला टायटेनियम, ब्लॅक आणि व्हाईट रंगात उपलब्ध करण्यात येणार आहेत. यूरोप व आशिया यासारख्या अन्य मोठ्या मार्केटमध्ये हे फोन उपलब्ध करण्यात येणार आहेत.

एलजीचा के६१ या फोनमध्ये ६.५ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले असणार आहे. फोनमध्ये ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी प्लस १२८ जीबी स्टोरेजचा पर्याय उपलब्ध आहे. आपण मायक्रोएसडी कार्डच्या साहायाने २ टीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. ४८ मेगापिक्सलचा मेन सेन्सर, ८ मेगापिक्सलचा सुपर वाइड सेन्सर, २ मेगापिक्सलचा मायक्रो शूटर आणि ५ मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेरा दिला आहे. या फोनमध्ये क्वॉड कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा फ्रंटला फोनमध्ये दिलेला आहे. त्यात ४००० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.