Library Wall | पोलंडहून आली अद्भूत छायाचित्रे, विद्यापीठाच्या भिंतीवर लिहिलेत उपनिषदातील श्लोक; भारतीय दूतावासाने केले ‘ट्विट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Library Wall | भारतीय वैदिक संस्कृती आणि विशेषता संस्कृतीबाबत पाश्चिमात्य लोकांमध्ये नेहमीच उत्सुकता असते. असेच काहीतरी मध्य यूरोपीय देश पोलंडमध्ये (Poland) पहायला मिळाले (Library Wall) आहे.

पोलंडची काही छायाचित्रे वायरल होत आहे, जिथे विद्यापीठाच्या भिंतीवर उपनिषदाचे श्लोक लिहिलेले आहेत. ही छायाचित्रे पोलंडमधील भारतीय दूतावासाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करण्यात आली,
जी आता सोशल मीडियावर वायरल होत आहेत.

ही छायाचित्रे 9 जुलैची आहेत जी इंडिया इन पोलंड (@IndiainPoland) च्या ट्विटर हँडलकडून ट्विट करण्यात आली.
पोलंडमध्ये भारतीय दूतावासाकडून फोटो ट्विट करून सांगण्यात आले की ही विद्यापीठाच्या लायब्ररीची भिंत आहे.

ट्विटमध्ये म्हटले आहे, किती सुखद आश्चर्य आहे!!
ही वारशॉ यूनिव्हर्सिटीची लायब्ररीची भिंत आहे,
जिथे उपनिषदचे श्लोक कोरले आहेत. उपनिषद हिंदू दर्शन शास्त्राच्या वैदिक संस्कृतचे मुळपाठ आहेत.

उपनिषद काय आहे?

उपनिषद हिंदू धर्माचा महत्वाचा श्रुती धर्मग्रंथ आहे. यांची संख्या जवळपास 108 आहे. तर मुख्य उपनिषद 13 मानले गेले आहेत.
प्रत्येक उपनिषदाची गोष्ट एखाद्या वेदाशी जोडलेली आहे आणि त्यामध्ये त्यांचा उल्लेख आहे.
उपनिषदांना ’वेदांत’ सुद्धा म्हटले जाते.

 

Web Title : Library Wall | poland upanishads written on warsaw university library wall image goes viral

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Gold Price Today | सोने पुन्हा झाले 47 हजारी, चांदी 766 रुपयांनी महागली, जाणून घ्या नवीन दर

Pune News | ‘त्या’ वक्तव्यावरून गणेश बिडकर यांचा खुलासा, म्हणाले… (VIDEO)

Pune Rural Lockdown | …तर पुणे जिल्ह्यातील तब्बल 42 गावात कडक लॉकडाऊन