LIC Aadhaar Shila Plan | महिलांसाठी LIC ची मस्त पॉलिसी ! कमी गुंतवणुक करा अन् मिळवा लाखोंचा लाभ; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – LIC Aadhaar Shila Plan | भारतातील सर्वात मोठी असणारी कंपनी म्हणजे भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) आहे. या एलआयसी कंपनीवर अनेक लाखो लोकांचा विश्वास आहे. दरम्यान, एलआयसी देखील आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या योजना आखत असते. भविष्याचा विचार करता लोकांनाही संबंधित योजनेचे आयोजन करावे लागते. दरम्यान एलआयसीने आणखी एक महत्वाची योजना समोर आणली आहे. कमी पैशात चांगली बचत होणारी योजना आणली आहे. खरंतर ही योजना महिलांसाठी उपयुक्त अशी योजना आहे. छोट्या गुंतवणुकीपासून सुरुवात करायची असेल तर आधार शिला पॉलिसी (LIC Aadhaar Shila Plan) ही योजना LIC ने आणली आहे. या योजनेमधून गुंतवणूक करणाऱ्या महिलांना बचत आणि सुरक्षा दोन्ही लाभ मिळणार आहे. या योजनेबाबत सविस्तर जाणून घ्या.

 

 

या योजनेमध्ये (LIC Aadhaar Shila Plan) 8 वर्षे वयापासून ते 55 वर्षे वयापर्यंत गुंतवणूक करता येते. या पॉलिसीमध्ये महिलांना अनेक प्रकारचा लाभ देखील मिळणार आहे. समजा या योजनेत कोणतीही महिला किमान 75 हजार रुपये आणि कमाल 3 लाख रुपयांचा विमा खरेदी करू शकते. या योजनेअंतर्गत तुम्ही तिमाही, सहामाही आणि वार्षिक आधारावर गुंतवणूक करू शकता. तसेच तुम्ही किमान 10 वर्षे आणि अधिकाधिक 20 वर्षे गुंतवणूक करू शकता. जर तुम्ही 20 वर्षे प्रतिमहिना 899 रुपये जमा केले तर पहिल्या वर्षी तुम्ही केवळ 10,959 रुपये जमा कराल. यावर 4.5 टक्के कर देखील भरावा लागणार आहे.

 

 

दरम्यान, आधार शिला योजना विकत घेतलेल्या महिलेचा दुर्दैवाने मृत्यू (Died) झाला, तर यात निश्चित रक्कम तिच्या घरातील सदस्यांना दिली जाणार आहे. या योजनेमध्ये कोणतीही आयकर सवलत उपलब्ध नसणार आहे. दरम्यान, जर तुम्ही 20 वर्षांसाठी प्रतिमहिना 899 रुपये जमा केले तर 20 वर्षात तुम्ही एकूण 2 लाख 14 हजार रुपये गुंतवाल. तुम्हाला पॉलिसीच्या मॅच्युरिटीवर 3 लाख 97 हजार रुपये मिळतील. या पॉलिसीत गुंतवणूक करून महिला त्यांचे भविष्य सुरक्षित करू शकतात आणि 20 वर्षांनंतर मोठी रक्कम जमा करू शकणार आहे.

कोण घेऊ शकणार ही पॉलिसी?

– गुंतवणूक करण्यासाठी किमान वयोमर्यादा 8 वर्षे.

– कमाल 55 वर्षांची महिला ही पॉलिसी घेऊ शकते.

– पॉलिसी बचत आणि लाइफ कवर प्रदान करते.

– पॉलिसीच्या मॅच्युरिटी वर, पॉलिसीधारकाला एकरकमी रक्कम मिळते.

– पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास कुटुंबाला मदतीची रक्कम मिळते.

 

Web Title :- LIC Aadhaar Shila Plan | lic aadhaar shila plan for woman know about policy

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Monalisa Latest Bold Photoshoot | मोनालिसाने अतिशय बोल्ड ब्लाउज घालून केला फोटोशूट , चाहते म्हणाले…

 

Rani Chatterjee | ट्रोलरला राणी चॅटर्जीच्या बॉडी शेमिंगचा करावा लागला ‘सामना’, अभिनेत्रीने दिले सडेतोड उत्तर

 

Raashi Khanna-South Backless Queen | साऊथची ही अभिनेत्री आहे बॅकलेस क्वीन, बॉलीवूडच्या सौंदर्यवतींना देखील टाकलं मागे