LIC Aadharshila Plan | महिलांसाठी LIC ची विशेष विमा योजना, रोज 29 रुपये जमा केल्यावर किती लाख मिळतील, जाणून घ्या
नवी दिल्ली : वृत्त संस्था – LIC Aadharshila Plan | देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC सतत नवनवीन विमा योजना आणत असते. यावेळी त्यांनी महिलांसाठी आणलेली विशेष विमा योजना अधिक लोकप्रिय होत आहे. ’आधार शिला’ (LIC Aadharshila Plan) असे या योजनेचे नाव आहे. ही पॉलिसी फक्त त्या महिला खरेदी करू शकतात, ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे.
ही योजना 1 फेब्रुवारी 2020 रोजी लाँच करण्यात आली. लाईफ कव्हरसोबत, ही पॉलिसी बचत देखील देते. जर एखाद्या महिलेने या पॉलिसीमध्ये दररोज 29 रुपये गुंतवले तर तिला मॅच्युरिटीवर 4 लाख रुपये मिळतील. या काळात या योजनेत कर्जही घेता येते.
1. किती कालावधीसाठी घेता येईल प्लान
8 ते 55 वयोगटातील कोणतीही महिला ही पॉलिसी घेऊ शकते. ही 10 वर्षांसाठी खरेदी केले जाऊ शकते. कमाल मुदत 20 वर्षे आहे. मॅच्युरिटीच्या वेळी महिलेचे वय 70 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
2. विमा रक्कम
या योजनेअंतर्गत, किमान 75 हजार रुपयांचा विमा मिळू शकतो तर कमाल रक्कम 30 लाख रुपये आहे. यामध्ये पॉलिसीधारक अपघाताचा लाभ घेऊ शकतो. (LIC Aadharshila Plan)
3. किती असेल प्रीमियम
जर एखादी महिला 20 वर्षांची असेल आणि पॉलिसीची मुदत देखील 20 वर्षांची असेल आणि तिने 3 लाख रुपयांचा विमा उतरवला असेल, तर तिला वार्षिक सुमारे 10,868 रुपये प्रीमियम भरावा लागेल. मात्र, पुढील वर्षी हा प्रीमियम 10,649 रुपयांपर्यंत खाली येईल.
4. मॅच्युरिटी बेनिफिट
मॅच्युरिटी झाल्यावर 4 लाख रुपये मिळतील. 2 लाख विमा रक्कम आणि शिल्लक रक्कम ही लॉयल्टी बोनस असेल.
5. प्रीमियम पेमेंट
या योजनेत मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक आधारावर प्रीमियम जमा करता येईल. वेळेवर प्रीमियम भरण्यास विसरल्यास, तुम्हाला 30 दिवसांचा अतिरिक्त कालावधी मिळेल. परंतु, तुम्ही मासिक आधारावर प्रीमियम भरण्याचे निवडल्यास, तुम्हाला 15 दिवसांचा अतिरिक्त कालावधी मिळेल.
6. कॅश बेनिफिट
पॉलिसी सुरू झाल्यापासून 5 वर्षांच्या आत पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास, विम्याच्या रकमेइतकी रक्कम दिली जाईल.
परंतु, यानंतर मृत्यू झाल्यास, नामांकित व्यक्तीला विमा रक्कम आणि लॉयल्टी बोनस देखील मिळेल.
7. सेटलमेंट
मॅच्युरिटीवर, तुम्ही पूर्ण पेमेंट एकाच वेळी किंवा हप्त्यांमध्ये मिळवू शकता.
8. सरेंडर करणे
सलग दोन वर्षे प्रीमियम भरल्यानंतर ही पॉलिसी कधीही सरेंडर केली जाऊ शकते.
Web Title : LIC Aadharshila Plan | lic aadharshila plan its benefits and everything you should know
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Income Tax Return | IT रिटर्न भरण्याची डेडलाइन आता 15 मार्चPune Corporation | समाविष्ट 23 गावांतील ‘त्या’ सोसायट्यांना पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी बिल्डरांचीच अन्यथा…AICTS Pune Recruitment 2022 | 3 री उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी ! पुण्यातील सरकारी इन्स्टिटयूटमध्ये भरती; जाणून घ्याSupreme Court | भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनाच्या कारवाईवर SC चे कडक ताशेरे, ‘महाविकास’ सरकारच्या अडचणी वाढवणारं निरीक्षण नोंदवलं
Ajit Pawar | महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय, अजित पवारांनी दिले ‘हे’ तातडीचे निर्देश