LIC मध्ये 100 पदांसाठी नोकर भरती, 32 हजार पगार, जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्त संस्था – LIC AAO Recruitment 2020 : लाईफ इन्श्युरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एलआयसी) ने 168 असिस्टन्ट अ‍ॅडमिनिस्ट्रेटीव्ह ऑफिसरच्या पदासाठी भरती काढली आहे. जे उमेदवार मोठ्या कालावधीपासून नोकरीच्या शोधात होते, त्यांच्यासाठी ही चांगली संधी आहे. अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली माहिती जाणून घ्या.

* पदांची नावे :

एलआयसीमध्ये असिस्टन्ट अ‍ॅडमिनिस्ट्रेटीव्ह ऑफिसरच्या पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. ज्यामध्ये खालील पदे आहेत.

– AAO (CA)

– AAO (Actuarial)

– AAO (Legal)

– AAO (Rajbhasha)

– AAO (IT)

* पात्रता :

या सर्व पदांसाठी पात्रता वेगवेगळी आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत नोटिफिकेशन पाहा.

* काय आहे अर्जाचे शुल्क :

जनरल उमेदवारांसाठी अर्जाची फि 700 आणि SC/ST/PwD उमेदवारांसाठी 85 रुपये आहे.

* महत्वाच्या तारखा :

– अर्ज करण्याची तारीख – 25 फेब्रुवारी 2020

– अर्ज करण्याची अखेरची तारीख – 15 मार्च 2020

– ऑनलाइन प्रीलिमनरी परीक्षेचे कॉल लेटर – 27 मार्चते 4 एप्रिल 2020 दरम्यान मिळू शकते.

– प्रीलिमनरी परीक्षा – 4 मार्च 2020

* कसा कराल अर्ज :

– अर्ज करणार्‍या उमेदवारांना अधिकृत वेबसाइट licindia.in वर जाऊन अर्ज करावा लागेल.

* कशी होईल निवड :

– उमेदवारांची निवड प्रीलिमनरी परीक्षा आणि मेन्स ऑनलाईन परीक्षेने होईल.

* वेतन असे असेल :

– निवड झालेल्या उमेदवारांना प्रति महीना 32,795 रुपये वेतन दिले जाईल.