धक्कादायक ! LIC एजंटकडून १४ वर्षाच्या मुलावर लैंगिक ‘अत्याचार’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – घरी आलेल्या एका एलआयसी एजंटने मुलाला दवाखान्यात घेऊन जातो असे सांगून १४ वर्षाला मुलाला घेऊन जाऊन त्याच्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. ही घटना भोसरीतील इंद्रायणीनगर व आरोपीच्या कारमध्ये १५ मे रोजी रात्री साडेआठ ते साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान घडली.

लक्ष्मण जिजाबा वाडेकर (वय ४५, रा. पाटील इस्टेट, वाडा रोड, राजगुरुनगर) याच्यावर भोसरी पोलिसांनी पोस्को अ‍ॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी एका ३७ वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, लक्ष्मण वाडेकर हा एलआयसी एजंट असून तो या महिलेच्या घरी एलआयसीच्या हप्त्याचा चेक घेण्यासाठी आला होता. त्यावेळी त्यांचा १४ वर्षाचा मुलगा तेथेच होता. त्यांच्याशी बोलताना त्याने तुमच्या मुलाच्या उंचीच्या मानाने वजन खूप कमी आहे. त्याचे वजन करुन आणतो असे सांगून त्याला आपल्या कारमधून घेऊन गेला. वाटेत कार एका ठिकाणी थांबवून त्याने या मुलावर अनैसर्गिक अत्याचार केला. ही बाब कोणाला न सांगण्याची धमकी दिली. पोलीस उपनिरीक्षक हंडाळ अधिक तपास करीत आहेत.