LIC ने सर्व पॉलिसीधारकांसाठी जारी केली महत्वाची सूचना, तात्काळ जाणून घ्या अन्यथा…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एलआयसीने सर्व पॉलिसी होल्डर्ससाठी ट्विट करून महत्वाची सूचना जारी केली आहे. पॉलिसीसोबत पॅनकार्ड लिंक (PAN link with LIC policy) करणे आवश्यक आहे. एलआयसी (LIC) ने आपल्या ऑफिशियल वेबसाइटवर याबाबत माहिती दिली आहे.

सरकारने PAN आणि आधार लिंक करण्याची शेवटची तारीख वाढवून 31 मार्च 2022 केली आहे. काहीसा असाच नियम मार्केट रेग्युलेटर सेबीने (SEBI) सुद्धा ठरवला आहे आणि गुंतवणुकदारांना पॅनसोबत आधार कार्ड लिंक करण्यास सांगितले आहे. अशाप्रकारे एलआयसी सुद्धा पॅनसोबत लिंक करण्यास सांगितले आहे.

पॉलिसीला आधारसोबत असे ऑनलाइन करा लिंक :
1. PAN च्या वेबसाइटवर पॉलिसीच्या यादीसोबत पॅनची माहिती द्या.

2. आता मोबाइल नंबर नोंदवा. एलआयसीकडून त्यां मोबाइल नंबरवर एक ओटीपी येईल. तो नोंदवा.

3. फॉर्म सबमिट झाल्यानंतर रजिस्ट्रेशन रिक्वेस्ट यशस्वी झाल्याचा मेसेज येईल.

4. आता पॅन-पॉलिसी लिंक झाली आहे.

घरबसल्या चेक करा पॉलिसी स्टेटस
प्रथम वेबसाइट https://www.licindia.in/ वर जा. येथे रजिस्ट्रेशन करा.

रजिस्ट्रेशन करण्यासाठी कोणताही चार्ज नाही. जन्मतारीख, नाव, पॉलिसी नंबर टाका. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर स्टेटस तपासू शकता.

अधिक माहितीसाठी 022 6827 6827 वर फोन करू शकता.

9222492224 नंबरवर LICHELP < पॉलिसी नंबर लिहून सुद्धा मेसेज पाठवू शकता.

एसएमएसद्वारे मिळवा माहिती
पॉलिसी स्टेटससाठी 56677 वर एसएमएस पाठवा.

LIC पॉलिसीचा प्रीमियम जाणून घेण्यासाठी ASKLIC PREMIUM टाइप करा 56677 नंबर वर एसएमएस पाठवा.

पॉलिसी लॅप्स झाली असेल तर ASKLIC REVIVAL टाइप करून एसएमएस पाठवा.

Web Titel :- LIC | all lic policy holders link your pan with your lic policies check how

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pan-Aadhar Linking | आधार कार्डधारकांनी लवकर केले नाही ‘हे’ काम तर होईल मोठे नुकसान, जाणून घ्या

PMPML | एमएनजीएल कंपनीकडून पीएमपीच्या शिवाजीनगर आणि कात्रज डेपोतील पंपांचा गॅस पुरवठा बंद; बस सेवा विस्कळीत होणार?

MLA Sharad Ranpise | काँग्रेसचे विधान परिषद गटनेते आमदार शरद रणपिसे यांची प्रकृती चिंताजनक