LIC पॉलिसीधारकांसाठी खुशखबर ! बंद झालेल्या पॉलिसीबाबतचे नियम बदलले, जाणून घ्या कसा होणार फायदा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून बंद असलेल्या पॉलिसीला तुम्ही पुन्हा सुरु करू शकता. एलआयसीने जुन्या पॉलिसीला पुन्हा सुरु करण्याबाबत एक नवीन निर्णय घेतला आहे. जर कोणाची पॉलिसी ट्रॅडिशनल नॉन-लिंक्ड पॉलिसी असेल तर त्याला पाच वर्षांपर्यंत मुदत दिली जाणार आहे. ठरलेल्या वेळेत पॉलिसीचा हप्ता भरला नाही तर पॉलिसी रद्द होते मात्र यावेळी पॉलिसीधारकाकडे थोडा कालावधी असतो की तो त्यामध्ये ती पॉलिसी पुन्हा सुरु करू शकेल.

काय होता नियम –

IRDA प्रोडक्ट रेग्युलेशन 2013 ला 1 जानेवारी 2014 मध्ये लागू करण्यात आले होते. यामध्ये पहिल्या वेळेस हप्ता न भरल्यास दोन वर्षां पर्यंतचीच मुदत होती. अशात कोणत्याही पॉलिसीधारकाने 1 जानेवारी 2014 नंतर पॉलिसी खरेदी केलेली असेल तर पाच वर्षांमध्ये नॉन – लिंक्ड पॉलिसीला पुन्हा सुरु करता येत नव्हते मात्र यूनिट लिंक्ड पॉलिसीसाठी हा कालावधी तीन वर्षांपर्यंतचा होता जो की पहिला हफ्ता चुकवल्यापासून सुरु होत असे. मात्र आता जर हफ्ता न भरल्याने पॉलिसी बंद होत असेल तर ग्राहक तिला पुन्हा सुरु करू शकतो.

हफ्ता थकल्याने होत होती अडचण –

LIC अधिकारी विपीन आनंद यांनी सांगितले की, जीवन विमा सुरु करण्याबाबत प्रत्येकजण विचार करत असतो मात्र कधी कधी परिस्थितीमुळे ग्राहकाला प्रीमियम भरता येत नाही आणि पॉलिसी लॅप्स होते. अशात नंतर दुसरी पॉलिसी पुन्हा घेण्याऐवजी जुनी पॉलिसी पुन्हा सुरु करणे कधीपण फायद्याचे ठरते.

LIC ने केलेल्या मागणीला IRDAची संमती –

हीच बाबा लक्षात घेऊन एलआयसीने विमा नियामक यांच्याकडे विशेष मागणी केली होती. 1 जानेवारी 2014 नंतर पॉलिसी घेतलेल्यांना विमा नियामक मंडळाने दिलासा दिला आहे. यानंतर जर एखाद्या पॉलिसी ग्राहकाने आपली पॉलिसी पुन्हा सुरु केली तर त्याला त्या पॉलिसीचा फायदा मिळणार आहे. त्यासाठी ग्राहकाला इतर काहीही खरेदी करण्याची गरज नाही.

Visit : Policenama.com