LIC NPS Fund नं 3 वर्षात दिला जबरदस्त ‘रिटर्न’, जाणून घ्या आपण कशा पद्धतीनं करू शकता अधिक ‘कमाई’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : गेल्या तीन वर्षांत, सरकारी सिक्युरिटीज (Government Securities) फंडातील जवळपास सर्वच नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS- National Pension System) टियर -2 ने दुप्पट परतावा दिला आहे. या तीन वर्षांत 7 पेन्शन फंड व्यवस्थापकांनी 11.01 टक्क्यांपासून ते 13.5 टक्क्यांपर्यंत वार्षिक परतावा दिला आहे. त्याच वेळी, सीसीआयएल सॉवरेन बॉन्ड (CCIL Sovereign Bond) आणि 10 वर्षाच्या गिल्ड म्युच्युअल फंडा (Guild Mutual Fund) ने 10.78 टक्क्यांचाच परतावा दिला आहे.

एलआयसी पेन्शन फंड क्रमांक एकवर कायम

एलआयसी पेन्शन फंड (LIC Pension Fund) ने टीयर -2 विभागात प्रथम स्थान मिळविले आहे. तीन वर्षांत एलआयसीने 13.5 टक्के परतावा मिळविला आहे. Value Research च्या आकड्यांद्वारे याबाबत माहिती मिळते. एलआयसीच्या अगदी जवळच एचडीएफसी पेन्शन फंड (HDFC Pension Fund) देखील आहे. एचडीएफसी पेन्शनने 11.7% परतावा दिला आहे. एलआयसी पेन्शन फंडाने 5 वर्षांच्या परतावा कालावधीतही सर्वाधिक परतावा दिला आहे. या कालावधीत एलआयसी पेन्शन फंडाने 11.88 टक्के परतावा दिला आहे. याप्रकारे परताव्याच्या बाबतीत हे सर्व एनपीएस फंड आणि म्युच्युअल फंडांच्या तुलनेत पुढे जाण्यास यशस्वी ठरले आहे.

केवळ एनपीएस टियर -2 खातीच का?

वयाच्या 60 व्या वर्षी मॅच्युअर होणाऱ्या रिटायरमेंट्स अकाउंट्स एनपीएस टियर -1 पेक्षा वेगळ्या एनपीएस टियर -2 चे बरेच फायदे आहेत. हे गुंतवणूक खाते असल्याने आपण आपल्या गरजेनुसार पैसे काढू शकता. तथापि, सरकारी कर्मचारी वगळता आयकर कायद्या (Income Tax Act) तील कलम 80C अंतर्गत टियर-2 खात्यावर कोणताही कर लाभ मिळत नाही. एक बेस पॉईंटचे कमी खर्च प्रमाण हे गुंतवणूकदारांना आकर्षित करते. पुढील वर्षी पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाद्वारे (PFRDA) नवीन पेंशन फंड व्यवस्थापकांची निवड झाल्यानंतरही हे लागूच राहील. इक्विटी स्कीम (Equity Schemes) साठी 0.09 टक्क्यांची जास्तीत जास्त प्रस्तावित गुंतवणूक व्यवस्थापन फी आणि 0.03 टक्क्यांच्या मध्यस्थ शुल्कासह म्युच्युअल फंड आणि इतर वित्तीय साधनांच्या तुलनेत एनपीएस सर्वात स्वस्त पर्याय राहील.

टीयर -2 एनपीएस खात्यात कशी गुंतवणूक करावी

टियर -2 खात्यात गुंतवणूक करण्यासाठी आपण टियर-1 रिटायरमेंट खाते उघडले पाहिजे. कमीतकमी 1,000 रुपयांमध्ये नवीन खाते उघडता येईल, त्यात पुढे किमान 250 रुपयांचे योगदान द्यावे लागेल. हे एक व्हॉलेंटरी खाते असल्याने दरवर्षी त्यात गुंतवणूक करणे बंधनकारक नाही. यासाठी आपण 7 पैकी कोणत्या एका पेन्शन फंड मॅनेजरला निवडू शकता.

आवश्यक नाही की आपण त्याच टियर-2 पेन्शन मॅनेजरला निवडावे, ज्याला तुम्ही टियर-1 खात्यासाठी निवडलेले आहे. गुंतवणूकीचे नियम टियर-1 खात्यासारखेच असतील. 50 वर्षांपेक्षा कमी वयाच्या सदस्यांना इक्विटी मालमत्ता वर्गात 75% एक्सपोजर मिळेल. वैकल्पिकरित्या आपले भांडवल व्यवस्थापित करण्यासाठी आपण ऑटो चॉईस गुंतवणूक पर्याय निवडू शकता.