Coronavirus : LIC नं घेतला मोठा निर्णय, कोट्यावधी ग्राहकांना मिळणार दिलासा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एलआयसी) आपल्या लाखो ग्राहकांना एक मोठी भेट दिली आहे. एलआयसीने कोरोना व्हायरस साथीच्या रोगामुळे प्रीमियम भरण्यास असमर्थ असणाऱ्या पॉलिसीधारकांची अंतिम मुदत 15 एप्रिल 2020 पर्यंत वाढविली आहे. एलआयसीने एका निवेदनात म्हटले कि, कोविड -19 च्या पार्श्वभूमीवर देशात निर्माण झालेली असाधारण परिस्थिती लक्षात घेता एलआयसीने आपल्या पॉलिसीधारकांना 15 एप्रिल 2020 पर्यंत दिलासा देण्याचे ठरविले आहे. हा निर्णय त्या सर्व ग्राहकांसाठी घेण्यात आला आहे जे काही कारणास्तव प्रीमियम भरण्यास असमर्थ आहेत. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी, बहुतेक राज्यांनी लोकांना सामाजिक अंतर कायम ठेवण्यास सांगितले आहे आणि आवश्यक नसल्यास प्रवास न करण्याचे आवाहन केले आहे.

अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन
त्याचबरोबर देशातील 75 जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. लॉकडाउन घोषित करण्यात आलेल्या राज्यांमध्ये तेलंगणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, राजस्थान, नागालँड, महाराष्ट्र इत्यादींचा समावेश आहे. देशात कोरोना विषाणूची 415 प्रकरणे समोर आली आहेत.

एप्रिल-फेब्रुवारी दरम्यान जीवनरहित विमा उतरवणाऱ्यांच्या प्रीमियममध्ये 14 टक्के वाढ चालू आर्थिक वर्षात फेब्रुवारीपर्यंत बिगर-जीवन विमा कंपन्यांचे प्रीमियम संग्रह 14 टक्क्यांनी वाढून 1.73 लाख कोटी रुपये झाले. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (आयआरडीए) च्या आकडेवारीत ही माहिती मिळाली आहे. आकडेवारीनुसार, अशा 34 जीवनरहित विमा कंपन्यांनी मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत 1.52 लाख कोटी रुपयांचे प्रीमियम गोळा केले होते. जीवनरहित विमा कंपन्यांमध्ये आरोग्य विमा, वाहन विमा, घर, दुकान, प्रवासादरम्यान विमा सुविधा देणार्‍या कंपन्यांचा समावेश आहे.