LIC मध्ये 8500 जागांच्या भरतीच्या परिक्षेचं वेळापत्रक बदललं, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय आयुर्विमा महामंडळाकडून (LIC) सहाय्यक पदासाठी (LIC Assistant) घेण्यात येणाऱ्या परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आला आहे. एलआयसीने सहाय्यक भरती 2019 च्या पूर्व परीक्षेसाठी सुधारित तारखा जाहीर केल्या आहेत. एलआयसीची पूर्व परीक्षा 30 आणि 31 ऑक्टोबर 2019 रोजी घेण्यात येईल. यापूर्वी पूर्व परीक्षा 21 आणि 22 ऑक्टोबर 2019 रोजी होणार होती.

एलआयसीने 1 ऑक्टोबर 2019 पूर्वी 8500 सहाय्यक पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अर्ज मागविले होते. त्यानुसार आता एलआयसीची पूर्व परीक्षा 30 आणि 31 ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार आहे. पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

एलआयसीच्या संकेतस्थळावर जाऊन उमेदवार अधिकृत नोटीसमधून सुधारित परीक्षेच्या तारखा तपासू शकतात.
अधिक माहितीसाठी वेबसाईट https://www.licindia.in/

Visit : Policenama.com

Loading...
You might also like