LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, 8000 जागांची भरती, जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आपण सरकारी नोकरीची तयारी करत असाल तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळाने सहाय्यक पदासाठी (LIC Assistant) अर्ज मागविले आहेत. 8000 जागांवर ही भरती होणार असून 1 ऑक्टोबर ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

पदाचे नाव – LIC Assistant

पदसंख्या – 8000

शैक्षणिक पात्रता – पदवीधर

अर्ज करण्याची मुदत –
ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख – 17 सप्टेंबर 2019
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख – 1 ऑक्टोबर 2019
हॉलतिकीट डाउनलोड करण्याची तारीख – 15 ऑक्टोबर 2019
पूर्व परीक्षा – 21,22 ऑक्टोबर 2019

परीक्षा शुल्क –

जनरल आणि ओबीसी वर्गातील उमेदवारांना 510 रुपये तर SC/ST/PWD आणि अपंग उमेदवारांना 85 रुपये शुल्क भरावे लागेल.

निवड प्रक्रिया-

पूर्व व मुख्य परीक्षेच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची वैद्यकीय तपासणी केली जाईल.

असा करा अर्ज-

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी भारतीय जीवन विमा महामंडळाच्या licindia.in या अधिकृत वेबसाइटवरून अर्ज भरावा.
पूर्व व मुख्य परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल.

You might also like