LIC Bachat Plus Scheme | एलआयसीच्या बचत प्लस योजनेत होतो दुप्पट फायदा, सेव्हिंगसह मिळेल लाईफ इन्श्युरन्सचा फायदा; जाणून घ्या सर्वकाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – LIC Bachat Plus Scheme | भारतीय आयुर्विमा महामंडळाची पॉलिसी नेहमीच देशवासीयांच्या विश्वासाला पात्र ठरली आहे. यामुळे कोट्यवधी लोक एलआयसीच्या वेगवेगळ्या पॉलिसींमध्ये गुंतवणूक करतात. एलआयसी पॉलिसीमध्ये, लोकांना जीवन विम्याव्यतिरिक्त इतर अनेक फायदे मिळतात. (LIC Bachat Plus Scheme)

एलआयसीची अशीच एक बचत प्लस योजना आहे, ज्यामध्ये गुंतवणुकीवर सुरक्षिततेसह बचतीचा पर्याय मिळतो. यामध्ये गुंतवणूक करून, भविष्यासाठी एक चांगला फंड देखील तयार करू शकता आणि आर्थिकदृष्ट्या मजबूत होऊ शकता.

LIC च्या बचत प्लस योजनेचे फायदे –
एलआयसीच्या या विशेष योजनेत सुरक्षिततेसोबतच बचतीचीही हमी देण्यात आली आहे. या पॉलिसीनुसार पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास कुटुंबाला आर्थिक मदत दिली जाते. तसेच, पॉलिसीच्या मॅच्युरिटीवर, पॉलिसीधारकाला एकरकमी रक्कम दिली जाते.

किती भरावा लागेल प्रीमियम –
LIC च्या बचत प्लस योजनेमध्ये एकदा किंवा 5 वर्षांच्या मर्यादित कालावधीसाठी प्रीमियम भरता येतो. या योजनेतील प्रीमियम वार्षिक, सहामाही, त्रैमासिक किंवा मासिक जमा करता येऊ शकतो. (LIC Bachat Plus Scheme)

तसेच, या पॉलिसीमध्ये, ग्राहकाला प्रीमियम भरण्यासाठी 30 दिवसांचा अतिरिक्त कालावधी देखील मिळतो. दुसरीकडे, वाढीव कालावधीत प्रीमियम भरला नाही, तर पॉलिसी रद्द होते आणि त्याचा लाभ मिळत नाही.

गरज भासल्यास कर्ज घेऊ शकता –
या योजनेअंतर्गत ग्राहकांना कर्ज घेण्याची सुविधाही मिळते.
पॉलिसीचे 3 महिने पूर्ण झाल्यानंतर किंवा फ्री लूक कालावधी पूर्ण झाल्यानंतर सिंगल प्रीमियम पर्यायामध्ये कर्ज मिळू शकते.
तर लिमिटेड प्रीमियम पेमेंट पर्यायामध्ये, किमान 2 वर्षांसाठी प्रीमियम भरल्यानंतर कर्ज उपलब्ध होईल.
त्याच वेळी, या पॉलिसीमध्ये किमान विमा रक्कम 1 लाख रुपये आहे आणि कमाल मर्यादा नाही.

पॉलिसीसाठी कसा करावा अर्ज –
एलआयसीच्या या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करायची असेल तर ऑनलाइन किंवा ऑफलाइन पेमेंट करू शकता.
ऑनलाइन पॉलिसी घेण्यासाठी, http://www.licindia.in वर जाऊन गुंतवणूक करावी लागेल.

तसेच, ऑफलाइन घेण्यासाठी, एलआयसीच्या कार्यालयात जावे लागेल.
एलआयसीच्या बचत प्लस योजनेत प्राप्तीकर कलम 80 सी अंतर्गत सूट देखील मिळते.

 

 

Web Title :- LIC Bachat Plus Scheme | double benefit in lic bachat plus scheme you will get the benefit of life insurance with savings know everything

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

EPFO | ईपीएफओ कर्मचाऱ्यांना नववर्षात गिफ्ट ! किमान मासिक निवृत्तीवेतन 1 हजार रुपयांवरून 9 हजार होण्याची शक्यता

 

India vs South Africa | टीम इंडिया आणि चाहत्यांना मोठा झटका, कर्णधार विराट कोहली दुसरी टेस्ट मॅच खेळणार नाही

 

OBC Reservation Maharashtra | ओबीसी आरक्षणाचा डेटा कधीपर्यंत मिळणार? अजित पवारांनी सांगितली महत्वाची माहिती