LIC मध्ये जमा असलेल्या तुमच्या पैशांवर वाढतेय ‘जोखीम’, NPA 5 वर्षात झाला ‘दुप्पट’, 30000 कोटींवर पोहचला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सरकारी क्षेत्रातील विमा कंपनी असल्याने भारतीय जीवन विमा निगम (LIC) ला विश्वासाचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे देशभरातील लोकांनी डोळे झाकून आपल्या आयुष्याच्या कमाईला एलआयसीच्या अनेक योजनांमध्ये गुंतवले आहे. परंतु अलिकडच्या काळातील बर्‍याच घटनांनी असे सूचित केले आहे की एलआयसीच्या रोख साठ्यावर जोखीम वाढत आहे.

बँकांप्रमाणेच होतेय चूक!
मोठ्या रोख साठ्यामुळे एलआयसी सरकारसाठी संकटमोचनाची भूमिका पार पाडत असते. त्यामुळे सार्वजनिक कंपन्या व बँकांचे शेअर्स खरेदी करुन त्यांना वाचविण्याचे काम एलआयसीने केले आहे. परंतु एलआयसीचे अद्ययावत लेजर खाते पाहून अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहेत.

एलआयसी देखील अशीच चूक करत आहे जशी खाजगी क्षेत्राला हजारो कोटी रुपयांचं लोन वाटून सार्वजनिक बँकांनी केली होती. या आर्थिक वर्षात २०१९-२० च्या पहिल्या सहा महिन्यात (एप्रिल ते सप्टेंबर) मध्ये एलआयसीची नॉन-परफॉर्मिंग मालमत्ता म्हणजे NPA ६.१०% वाढली आहे. ही एनपीए खासगी क्षेत्राच्या येस बँक, आयसीआयसीआय बँक, अ‍ॅक्सिस बँक जवळ आहे. एकेकाळी उत्तम मालमत्ता गुणवत्तेसाठी ओळखल्या जाणाऱ्या या खासगी बँका वाढत्या एनपीएमुळे त्रस्त झाल्या आहेत.

२०१९-२० च्या दुसऱ्या तिमाहीत येस बँकेचा एनपीए ७.३९ टक्के, आयसीआयसीआयचा एनपीए ६.३७ टक्के आणि अ‍ॅक्सिस बँकेचा एनपीए ५.०३ टक्क्यांवर पोहोचला होता.

राहुल गांधींनी व्यक्त केली चिंता
राहुल गांधींनी याबाबत चिंता व्यक्त करत बुधवारी या संबंधित ट्विट देखील केले. ते म्हटले कोट्यावधी लोक एलआयसीमध्ये गुंतवणूक करत असतात, कारण त्यांना एलआयसीवर विश्वास आहे. परंतु मोदी सरकार एलआयसीला नुकसान पोहोचवून लोकांचा विश्वास नष्ट करीत आहे.

बऱ्याच कंपन्यांना दिले आहे लोन
खरतर सार्वजनिक कंपनी एलआयसीने टर्म लोन आणि नॉन-कन्व्हर्टिबल डिबेंचर (NCDs) च्या स्वरूपात बऱ्याच कॉर्पोरेट कंपन्यांना लोन दिले आहे. एलआयसीकडे ३६ लाख कोटी रुपयांची संपत्ती वा रोख रक्कम आहे. ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत एलआयसीची एनपीए वाढून ३०,००० कोटी रुपयांवर गेली आहे.

गेल्या पाच वर्षांत एनपीएमध्ये दुपटीने वाढ झाली आहे आणि हे एकूण मालमत्तेच्या ६.१० टक्के झाले आहे. यापूर्वी एलआयसीची नॉन-परफॉर्मिंग मालमत्ता १. ५ ते २ टक्क्यांपर्यंत होती. प्रतिस्पर्धी असूनही एलआयसी अजूनही मजबूत परिस्थितीत आहे जवळपास दोन तृतीयांश प्रिमिअम मध्ये याची हिस्सेदारी आहे.

एलआयसी डिफॉल्टर्स कोण आहेत?
एलआयसीकडून कर्ज घेणाऱ्या डीफॉल्टर कंपन्यांमध्ये बरीच मोठी नावे आहेत. यामध्ये एस्सार पोर्ट, गॅमन, आयएल अँड एफएस, डेक्कन क्रॉनिकल, भूषण पॉवर, व्हिडिओकॉन इंडस्ट्रीज, आलोक इंडस्ट्रीज, अ‍ॅमट्रॅक ऑटो, एबीजी शिपयार्ड, युनिटेक, जीव्हीके पॉवर आणि जीटीएल यांचा समावेश आहे. एलआयसीने या कंपन्यांना मुदत कर्ज आणि एनसीडीच्या स्वरूपात कर्ज दिले आहे.

यातील बर्‍याच डिफॉल्टर्सकडून पैसे परत मिळणे कठीण आहे. तसेही हे खरे आहे की एलआयसीचा वर्षाकाठी २,६०० कोटींपेक्षा जास्त नफा आहे आणि एलआयसीने आपल्या लेजर खात्यात या एनपीएसाठी ९० टक्क्यांहून अधिक तरतूद केली आहे. परंतु बर्‍याच दिवाळखोर कंपन्यांच्या बाबतीत पैसे मिळवणे कठीण आहे आणि त्यांना दिलेले कर्ज बंद खात्यातच टाकावे लागेल, म्हणजेच एलआयसीला मोठे नुकसान होऊ शकते.

फेसबुक पेज लाईक करा –