LIC : दरमहा फक्त 713 रुपयांच्या प्रिमियमवर मिळवा 2 लाख रुपये, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन टीम : जर तुम्हीही एलआयसीची (LIC) एखादी पॉलिसी घेण्याबाबत विचार करत असाल तर भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात LIC ने एक नवी पॉलिसी बाजारात आणली आहे. ज्यात दरमहा केवळ 713 रुपये भरावे लागतील. एलआयसी बिमा ज्योती (LIC BIMA JYOTI) असे या नव्या पॉलिसीचे नाव आहे. या पॉलिसीमध्ये कर वजावट अन् परताव्याची हमी आहे.

एलआयसी बिमा ज्योतीमध्ये किमान हमी 1 लाख रुपये इतकी आहे. तर त्यावरील मिळकत 25 हजाराच्या फरकाने वाढत जाते. म्हणजेच 1.25 लाख, 1.50 लाख, आणि 2 लाख असा परतावा मिळू शकतो. 3 महिन्यांच्या बाळापासून ते 60 वर्षांच्या वयोवृद्धापर्यंत कोणालाही ही पॉलिसी सुरु करता येते. पॉलिसी कमीत कमी 18 वर्ष तर जास्तीत जास्त 75 व्या वर्षी मॅच्युअर होते.

यात तुम्ही दरमहा, त्रैमासिक, सहामाही, वार्षिक असे प्रिमिअम भरू शकता. तसेच दोन वर्ष प्रिमिअर भरल्यानंतर तुम्हाला पॉलिसी बंद देखील करता येते. तुमची जमा झालेली रक्कम तुम्हाला परत मिळेल. शिवाय पॉलिसीच्या आधारावर तुम्हाला कर्ज देखील मिळते. पॉलिसीची मुदत जेव्हा संपते तेव्हा तुम्हाला तुमची जमा झालेली रक्कम मिळतेच. पण त्यात वार्षिक पाच टक्के व्याज देखील जोडून मिळते.