नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना काळात फसवणुकीच्या प्रकारांमध्ये वाढ होत आहे. काही दिवसापूर्वी केवळ बँकेचा अधिकारी आहे वगैरे सांगून फसवत होते आता मात्र एलआयसी अधिकारी अथवा इरडाचे अधिकारी बनून ग्राहकांना कॉल करत त्यांच्या खात्यातून पैसे साफ करत आहेत. अशी अनेक प्रकरणे समोर येऊ लागल्याने देशातील सर्वात मोठी इंश्योरन्स कंपनी एलआयसीने आपल्या ग्राहकांना अलर्ट केले आहे. त्यामुळे आपण जर एलआयसी खातेधारक असाल तर वेळीच सावध व्हा.
एलआयसीच्या खातेधारकांना काही लोक फोन केल्यानंतर एलआयसी कर्मचारी अथवा इरडाचे अधिकारी सांगतात. त्यामुळे एलआयसीने एक अलर्ट जारी केला असून कंपनी आपल्या ग्राहकांना कुठलीही पॉलिसी सरेंडर करण्याचा सल्ला देत नाही असे म्हंटले आहे. अनोळखी नंबर वरून फोन आला तर उचलू नये. तसेच कोणतीही माहिती न देण्याचा सल्ला दिला आहे. एलआयसीच्या अधिकृत वेबसाइटवर आपली पॉलिसी रजिस्टर करावी आणि तेथेच सर्व प्रकारची माहिती मिळवावी.
गेल्या काही दिवसांत पॉलिसीची रक्कम तत्काळ देण्याच्या नावाखाली लाखोंची फसवणूक झाल्याचे एलआयसीने ट्विट केले असून ग्राहकांना पॉलिसीची चुकीची माहिती देऊन फसवणाऱ्या लोकांपासून सावध राहावे असे सांगितले आहे.
www.licindia.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन आपल्याला पॉलिसीसंदर्भात काही माहिती हवी असेल तर मिळू शकते. पण कोणत्याही क्रमांकावर फोन करून पॉलिसीची माहिती घेऊ नये. जर बनावट फोन आल्यास तत्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार करा. याशिवाय आपण [email protected] या लिंकवरही रिपोर्ट करू शकतात. ग्राहकांने आपली कुठल्याही प्रकारची माहिती शेअर करू नये. महत्वाचे म्हणजे पॉलिसी सरेंडरसंदर्भात कुणालाही माहिती देऊ नका. अधिक फायद्याच्या प्रलोभनाला बळी पडू नये असे आवाहनही करण्यात आले आहे. दरम्यान, आपल्याला अशा प्रकारचा फोन कॉल आल्यास, आपण co_crm_fb@licindia वर ईमेलद्वारे तक्रार नोंदवू शकता. ग्राहकांकडे LIC च्या वेबसाइटवर जाऊन ग्रीव्हांस रिड्रेसल ऑफिसरच्या डिटेल्स घेऊन त्याच्याशी संपर्क साधण्याचा पर्याय आहे