आता LIC क्लेम सेटलमेंट झाले आणखी सोपे, जाणून घ्या कोणते बदल केले आणि काय आहेत नवीन नियम

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसची प्रकरणे वाढलेली असतानाच देशातील सर्वात मोठी इन्श्युरन्स कंपनी लाईफ इंश्युरन्स कॉर्पोरेशन्स ऑफ इंडिया (एलआयसी) ने क्लेम सेटलमेंटमध्ये आपल्या पॉलिसी होल्डर्सला मोठा दिलासा दिला आहे. एलआयसीने क्लेम सेटलमेंटसाठी आवश्यक डॉक्युमेंट्स मृत्यु प्रमाणपत्राच्या ऐवजी मृत्यूच्या पर्यायी पुराव्यांना मान्यता दिली आहे.

एलआयसीने म्हटले की, पॉलिसी होल्डरचा मृत्यू होण्याच्या स्थितीत उशीर होत असल्यास म्हणजेच म्युनिसिपल डेथ सर्टिफिकेट मिळण्यात उशीर होत असल्यास त्यांचे नॉमिनी मृत्युचे इतर पुरावे देऊ शकतात. यापूर्वी क्लेम सेटलमेंटसाठी डेथ सर्टिफिकेट देणे अनिवार्य होते. परंतु आता पॉलिसी होल्डर डेथ सर्टिफिकेटच्या ऐवजी डिस्चार्ज समरी किंवा डेथ समरी देऊ शकतात, ज्यामध्ये मृत्युची तारीख आणि वेळ कोणत्याही मान्यता प्राप्त हॉस्पिटलद्वारे नोंदलेला असेल.

हे लक्षात ठेवा
क्लेम सेटलमेंटसाठी सरकार, एम्प्लॉयी स्टेट इन्श्युरन्स कॉर्पोरेशन, सशस्त्र दल आणि कॉर्पोरेट हॉस्पिटलकडून जारी डेथ समरीसुद्धा स्वीकारणार आहे. यामध्ये मृत्युचा दिवस आणि वेळ असावी. मात्र, या डॉक्युमेंटवर एलआयसीचा क्लास वन अधिकारी किंवा 10 वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेल्या डेव्हलपमेंट ऑफिसरची काऊंटर सही असणे आवश्यक आहे.

लाईफ सर्टिफिकेट जमा करण्याची अनिवार्यता नाही
यासोबतच अंत्यसंस्कार किंवा दफनविधीचे प्रमाणपत्र सुद्धा द्यावे लागेल. तर, दुसर्‍या प्रकरणात पहिल्या प्रमाणेच मृत्यु प्रमाणपत्र द्यावे लागेल. एलआयसीने कॅपिटल रिटर्नच्या एन्युटीजसाठी लाईफ सर्टिफिकेट जमा करण्याचा नियम 31 ऑक्टोबर 2021 पर्यंत रद्द केला आहे. यासोबतच एलआयसी ईमेलद्वारे पाठवलेले लाईफ सर्टिफिकेट स्वीकारणार आहे. तसेच पॉलिसीधारक आता मॅच्युरिटी क्लेम्ससाठी सुद्धा डॉक्युमेंट्स जवळच्या कोणत्याही एलआयसी ऑफिसमध्ये जमा करू शकतील. एलआयसीने क्लेमच्या वेगाने सेटलमेंटसाठी एनईएफटी आधारित रेकॉर्ड क्रिएशन सुरू केले आहे. अलिकडेच काही इन्श्युरन्स कंपन्या क्लेम सेटलमेंटसाठी त्रास देत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. यानंतर कंपनीने हे पाऊल उचलले आहे.