LIC HFL Associate Recruitment 2021 : एलआयसीमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, वार्षिक 9 लाखापर्यंत ‘सॅलरी’, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसीने) हौन्सिंग फायनान्स लिमिटेड (एचएफएल) मध्ये अनेक पदांवर भरती काढली आहे. या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना 9 लाख वार्षिक वेतन मिळू शकते. असोसिएटच्या 6 पदांवर उमेदवारांची भरती केली जाईल.

महत्वपूर्ण तारखा…
ऑनलाइन अर्जाची सुरुवात – 24 मे 2021
ऑनलाइन अर्जाची शेवटची तारीख – 07 जून 2021

वेतन
या 6 पदांवर निवड होणार्‍या उमेदवारांचे पे-स्केल वार्षिक 6 ते 9 लाख रुपयांपर्यंत असेल.

पात्रता
उमेदवाराकडे कोणत्याही मान्यता प्राप्त युनिव्हर्सिटीतून सोशल वर्क किंवा रुरल मॅनेजमेंटमध्ये 55 टक्के मार्क्ससह मास्ट डिग्री असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा आणि अर्ज शुल्क
भरतीसाठी 23 वर्ष ते 30 वर्ष वयाचे उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. वयाची गणना 01 जानेवारी 2021 पर्यंतच्या वयाच्या आधारावर केली जाईल. भरतीसाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही.

निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड ऑनलाइन परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारावर होईल.

भरतीशी संबंधीत नोटिफिकेशनसाठी येथे क्लिक करा.
https://www.lichousing.com/downloads/Advertisement_CSR.pdf

डायरेक्ट ऑनलाईन अर्जासाठी येथे क्लिक करा.
https://www.lichousing.com/submit_resume.php

अधिकृत वेबसाइटसाठी येथे क्लिक करा.
http://lichousing.com/index.php