घर खरेदीदारांना LIC ची भेट ! 6 महिने नाही द्यावा लागणार EMI, असा घ्या ऑफर्सचा लाभ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – घर खरेदी करणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. देशातील सर्वात मोठी गृहनिर्माण वित्त कंपनी एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेडने 2020 च्या गृह कर्जाची ऑफर सादर केली आहे. या ऑफरअंतर्गत ‘रेडी टू मूव्ह होम’च्या गृह कर्जावर 6 ईएमआय माफ केले जातील. याशिवाय अंडर कंस्ट्रक्शन घर / फ्लॅटच्या कर्जावर त्याच वेळी मूळ रक्कम द्यावी लागेल, ज्यावेळी तुम्ही घराचा ताबा घ्याल. गृह कर्जावरील व्याज दर 8.10 टक्के आहे. दरम्यान, ही ऑफर 15 जानेवारीपासून सुरू झाली असून ती 29 फेब्रुवारीपर्यंत चालेल. या ऑफरचे फायदे 15 मार्चपासून सुरू होतील. ऑफरमध्ये किमान 20 लाख रुपयांचे गृह कर्ज उपलब्ध असेल. याशिवाय जास्तीत जास्त 2 कोटी रुपयांचे कर्ज घेता येईल.

प्रक्रिया शुल्क
एक कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी कर्जाच्या रकमेच्या 0.25 टक्के प्रक्रिया शुल्क असेल, जे जास्तीत जास्त 10,000 रुपये (जीएसटीसह) असेल. 1 कोटी ते 5 कोटींच्या रकमेवर 0.25 टक्के प्रक्रिया शुल्क, कमाल 25,000 रुपये असेल. कर्ज जास्तीत जास्त 30 वर्षांसाठी असेल

एलआयसी एचएफएलच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, रेडी टू मूव्ह होमच्या ऑफरमध्ये गृहकर्ज घेतल्यावर 6 ईएमआय माफ केले जातील. या ऑफरमध्ये 2 ईएमआय 5 व्या व त्यानंतर 2 ईएमआय 10 व्या वर्षी माफ केले जातील आणि उर्वरित 2 ईएमआय कर्जाच्या मुदतीच्या 15 व्या वर्षी माफ केले जातील. तसेच एलआयसी एचएफएलच्या ऑफरमध्ये अंडर कन्स्ट्रक्शन घरे ताब्यात घेतल्याशिवाय मूळ रक्कम द्यावी लागणार नाही. हे कर्ज बांधकाम सुरू असलेल्या घर किंवा फ्लॅटसाठी आहे. यासाठी, कर्जदाराकडे डीफॉल्ट ट्रॅक रेकॉर्ड असणे आवश्यक आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/