LIC Housing Finance ने ग्राहकांना दिला झटका, होम लोन घेणे झाले महाग, व्याजदरात केली 0.50% वाढ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – LIC Housing Finance | देशातील आघाडीची गृहनिर्माण वित्त कंपनी एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (LIC HFL) ने ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. जर तुम्ही एलआयसी हाऊसिंग फायनान्सकडून कर्ज घेतले असेल तर जास्त ईएमआय भरण्यास तयार रहा. कंपनीने आपला प्राईम लेंडिंग रेट 50 बेस पॉईंटने वाढवला आहे. आता प्राईम लेंडिंग रेट (PLR) शी जोडलेल्या होम लोनचा ईएमआय वाढेल. (LIC Housing Finance)

 

गृहकर्जाचा नवा व्याजदर 8 टक्क्यांपासून सुरू
पीएलआर हा मानक व्याजदर आहे ज्याच्याशी एलआयसी हाऊसिंग फायनान्स गृह कर्ज जोडलेले आहे. या वाढीमुळे एलआयसी हाऊसिंगच्या गृहकर्जावरील नवीन व्याजदर 8 टक्क्यांपासून सुरू होईल. नवीन व्याजदर 22 ऑगस्ट 2022 पासून लागू झाला आहे. पूर्वी गृहकर्जावरील व्याजदर 7.50 टक्क्यांपासून सुरू होत असे. (LIC Housing Finance)

 

अलीकडेच भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दर 0.5 टक्क्यांनी वाढवून 5.4 टक्के केला होता. आरबीआयने मागील तीन पतधोरण आढाव्यात पॉलिसी रेट रेपो 1.40 टक्क्यांनी वाढवला आहे. रेपो दरात वाढ केल्यानंतर अनेक बँकांनी व्याजदर वाढवले आहेत.

EMI मध्ये होईल थोडा बदल
एलआयसी हाऊसिंग फायनान्सचे एमडी आणि सीईओ वाय. विश्वनाथ गौर, यांनी म्हटले आहे की, एलआयसी एचएफएलच्या व्याजदरातील वाढ ही बाजारातील सध्याच्या परिस्थितीशी सुसंगत आहे. रिझर्व्ह बँकेने 5 ऑगस्ट रोजी पतधोरण आढाव्यात रेपो दरात 0.5 टक्क्यांनी वाढ केली आहे. रेपो दरात वाढ झाल्यामुळे ईएमआय किंवा गृहकर्जाच्या कालावधीत काही चढ-उतार झाले आहेत, असे असले तरी घरांची मागणी जास्त राहील.

 

वेबसाइटनुसार, एलआयसी हाऊसिंग 8.05 टक्के व्याजदराने 50 लाख रुपयांपर्यंतचे गृहकर्ज आणि 50 लाख रुपयांपासून 2 कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज 8.25 टक्के व्याजाने देते.
हा व्याजदर त्या पगारदार आणि व्यावसायिकांसाठी आहे ज्यांचा सिबिल स्कोअर 700 किंवा त्याहून जास्त आहे.
600-699 दरम्यान क्रेडिट स्कोअर असलेल्यांसाठी 50 लाख रुपयांपर्यंतच्या गृहकर्जासाठी 8.30 टक्के
आणि रु.50 लाख ते 2 कोटी रुपयांच्या गृहकर्जासाठी 8.50 टक्के व्याजदर आहे.
600 पेक्षा कमी क्रेडिट स्कोअर असलेल्यांसाठी 50 लाख रुपयांपर्यंतच्या गृहकर्जासाठी 8.75 टक्के
आणि 50 लाख ते 2 कोटी रुपयांपर्यंतच्या गृहकर्जासाठी 8.95 टक्के व्याजदर आहे.

 

Web Title :- LIC Housing Finance |lic housing finance hikes prime lending rate by 50 basis points

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ajit Pawar | अजित पवार सत्ताधारी आमदारावर भडकले; म्हणाले – ‘अरे थांब ना बाबा.. आम्ही काय गोट्या खेळायला आलोय का?’

 

Chandrakant Patil | ‘त्या’ विद्यार्थ्यांची पदवी आणि पदव्युत्तरपर्यतची फी राज्य सरकार भरणार – चंद्रकांत पाटील

 

Dhananjay Munde | CM शिंदेंनी स्वत:चाच निर्णय फिरवल्यावरून धनंजय मुंडेंचा टोला