खुशखबर ! कमी पगार असणाऱ्यांचं देखील घराचं स्वप्न पूर्ण होणार ; ‘या’ कंपनीकडून ‘भन्नाट’ ऑफर, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय जीवन वीमा निगम हिची सहयोगी कंपनी LIC हाऊसिंग फायनान्सने गृह कर्जाची एक नवी योजना बाजारात आणली आहे. याअंतर्गत लोकांना वयाच्या ७५ वर्षे वयापर्यंत गृह कर्ज फेडण्याचा पर्याय मिळेल. याचा सर्वात जास्त फायदा त्या लोकांना होणार आहे ज्यांच्यावर खर्चाचा बोजा आधिक असतो. कारण कर्ज जेवढ्या जास्त कालावधीसाठी घेण्यात येते त्याचे हप्ते देखील तेवढेच कमी असतात. या योजनेमुळे त्यांना फायदा होणार आहे ज्याचा पगार कमी आहे आणि ते घर घेऊ इच्छित आहेत.

LIC हाऊसिंग फायनान्स वेतन कमी असल्यांना गृह कर्ज देईल. कंपनी त्या लोकांना गृह कर्ज देऊ इच्छित आहेत ज्याची कोणतीही क्रेडिट हिस्ट्री नाही.

Image result for lic finance

७५ वर्षांंपर्यंत फेडता येईल कर्ज –
LIC हाऊसिंग फायनान्सने ७५ वर्षाच्या वयापर्यंत कर्ज फेडण्याची सुविधा ग्राहकांना दिली आहे. या योजनेसाठी इंडिया मॉर्टगेज गॅरंटी कॉर्पोरेशनबरोबर करार केला आहे. या योजनेसाठी कर्जाची गॅरंटी आयएमजीसी उपलब्ध करुन देईल. आयएमजीसी स्वत: २० टक्के कर्जाची गॅरंटी घेईल.

LIC हाऊसिंग फायनान्स या योजनेअंतर्गत आयएमजीसी ग्राहकांकडे गृहकर्जासाठी काही गहाण ठेवण्याची अट ठेवेल. या योजनेअंतर्गत अशा लोकांना देखील कर्ज देण्यात येईल ज्यांची क्रेडिट हिस्ट्री चांगली नाही त्यांना देखील LIC कर्ज देणार आहे. ज्याचे वर्क प्रोफाइल चांगले नाही त्यांना देखील हे गृह कर्ज देण्यात येणार आहे.

LIC हाऊसिंग फायनान्स ही देशातील सर्वात मोठी हाऊसिंग फायनान्स करणारी कंपनी आहे. याचे देशभरात ऑफिसेस आहेत. याशिवाय दुबई कुवेत मध्ये देखील ऑफिस आहे. नॅशनल हाऊसिंग बँक, जेनवर्थ इंक, इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन आणि एशियन डेवलपमेंटल बँक याच्यात एक करार आहे. आयएमजीसी भारतात कर्ज देणाऱ्या संस्थांना मॉर्गेज डिफॉल्ट गॅरंटी देते.

तुमच्या कर्जची गॅरंटी घेणार IMGC-
थोडासा प्रीमियम दिल्यावर IMGC तुमच्या कर्जावर २० टक्के रक्कमेला गॅरंटी घेणार आहे. या अंतर्गत ६ EMI कवर होतील. एक कर्जासाठी प्रिमियनल लोनची रक्कम ०.९ टक्के तर १.५ टक्क्यांपर्यंत होऊ शकते. या प्रिमियमचा खर्च कर्ज घेणाऱ्यांना उचलावा लागेल. त्याला तुमच्या EMI शी जोडले जाईल. यामुळे कंपनी देखील ग्राहकांपर्यंत पोहचेल.

आरोग्यविषयक वृत्त

व्हिटॅमिन ‘डी’च्या कमतरतेमुळे लहान मुलांना होऊ शकतो ‘हाय बीपी’चा धोका

घरी तयार केलेले लोणी चवीसह देते आरोग्य !

‘या’ १३ आरोग्य समस्यांवर आहेत ‘हे’ रामबाण उपाय

पावसाळ्यात काजळाने होते इन्फेक्शन ! अशी घ्या काळजी

केसगळतीच्या समस्येवर ‘हे’ घरगुती उपाय ठरतील वरदान

दररोज ४ काजू, ८ मनुका सेवन करा, झटपट बरे होतील ‘हे’ आजार

रात्री उशिरापर्यंत जागणाऱ्या पुरुषांना येऊ शकते ‘नपुंसकत्व’

‘पांढरे डाग’ घालवण्याचे घरगुती उपाय

असा दूर करा ‘विसरभोळेपणा’, जगा आनंदी आयुष्य