LIC च्या या योजनेत ज्येष्ठांना दरमहिना मिळेल 9250 रुपये पेन्शन, पती-पत्नीला मिळू शकतो दुप्पट लाभ, जाणून घ्या सर्वकाही

0
128
How To Surrender LIC Policy do you want to surrender lic policy guess what to do know about process
file photo

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – LIC | निवृत्तीनंतर अनेकांना दैनंदिन खर्चाची समस्या असते. म्हणूनच केंद्र सरकारच्या अशाच एका योजनेबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ज्यामध्ये तुम्हाला दरमहा 9250 रुपये पेन्शन मिळेल. ज्याद्वारे तुम्ही निवृत्तीनंतरचे जीवन सहजतेने जगू शकाल. वास्तविक, येथे आम्ही तुम्हाला प्रधानमंत्री वय वंदना योजनेबद्दल Pradhan Mantri Vaya Vandana Yojana (PMVVY) सांगणार आहोत, ज्यामध्ये गुंतवणूक केल्यानंतर निवृत्तीनंतर कोणतेही टेन्शन येणार नाही. या योजनेबाबत जाणून घेवूयात. (LIC)

 

कशी करावी गुंतवणूक –
प्रधानमंत्री वय वंदना योजना ही सरकारी पेन्शन योजना आहे. जी भारतीय आयुर्विमा महामंडळ चालवत आहे. केंद्र सरकारने 4 मे 2017 रोजी ज्येष्ठ नागरिकांना डोळ्यासमोर ठेवून ही योजना सुरू केली. या योजनेत एकरकमी किंवा दर महिन्याला गुंतवणूक करता येते.

 

PMVVY मध्ये मिळते इतके व्याज –
केंद्र सरकारच्या या योजनेत वार्षिक 7.40 टक्के दराने व्याज दिले जाते. ज्यामध्ये दरमहा एकरकमी जमा करून निश्चित पेन्शन मिळू शकते. या योजनेत एकरकमी गुंतवणुकीची मर्यादा 7.5 लाख रुपये होती. जी आता 15 लाख रुपये करण्यात आली आहे. (LIC)

दरमहा रु. 9250 उत्पन्न असेल –
पीएम वय वंदना योजनेअंतर्गत जास्तीत जास्त मासिक पेन्शनची रक्कम 9250 रुपये आहे. तुम्ही 27,750 रुपये अर्धवार्षिक पेन्शन म्हणून घेऊ शकता आणि तुम्हाला वार्षिक पेन्शन हवी असेल तुम्हाला 1.11 लाख रुपये मिळतील.

पण यासाठी तुम्हाला स्कीममध्ये 15 लाख रुपये जमा करावे लागतील. या योजनेची मुदत 10 वर्षे आहे. जर पती-पत्नी या योजनेत एकत्र गुंतवणूक करत असतील आणि गुंतवणुकीची रक्कम 30 लाख रुपये असेल, तर दरमहा 18,500 रुपये पेन्शन म्हणून मिळतील.

 

कोण करू शकतात गुंतवणूक –
पीएम वय वंदना योजनेमध्ये 60 वर्षांपेक्षा जास्त वय असलेला कोणताही भारतीय नागरिक गुंतवणूक करू शकतो.
या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची वैद्यकीय तपासणी करावी लागणार नाही.
दुसरीकडे, योजनेच्या मध्यभागी गुंतवणूकदाराचा मृत्यू झाल्यास, नॉमिनीला संपूर्ण रक्कम परत मिळते.
याशिवाय या योजनेत तीन वर्षांनी कर्ज घेण्याचीही सुविधा आहे.

 

Web Title :- LIC | in this scheme of lic elderly get pension of rs 9250 every month husband and wife get double benefits

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा