शेअर बाजारातील गुंतवणूकीवर LIC ला अवघ्या अडीच महिन्यात 57 हजार कोटींचा फटका

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गेल्या अडीच महिन्यांत भारतीय जीवन विमा महामंडळाने (LIC) शेअर बाजारात गुंतवणूक करून 57,000 कोटी रुपयांचे नुकसान केले आहे. एलआयसीने ज्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली त्यामध्ये 81 टक्क्यांनी बाजारमूल्यात घट झाली आहे.

शेअर बाजारात केलेल्या गुंतवणूकीमुळे एलआयसीला या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत (जुलै ते सप्टेंबर पर्यंत) 57,000 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. आयटीसीमध्ये एलआयसीची सर्वाधिक गुंतवणूक आहे, त्यानंतर एसबीआय, ओएनजीसी, एल अँड टी, कोल इंडिया, एनटीपीसी, इंडियन ऑईल आणि रिलायन्स इंडस्ट्रीज आहेत.

बिझनेस स्टँडर्डच्या मते जूनच्या तिमाहीअखेरीस स्टॉक मार्केटमध्ये सूचीबद्ध कंपन्यांमध्ये एलआयसीचे गुंतवणूक मूल्य 5.43 लाख कोटी रुपये होते, परंतु आता ते घसरून अवघ्या 4.86 लाख कोटींवर आले आहे. अशा प्रकारे एलआयसीच्या शेअर बाजारात अवघ्या अडीच महिन्यांच्या गुंतवणूकीवर 57 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

देशातील कोट्यवधी लोकांच्या कष्टाच्या कमाईच्या लाखो करोडो रुपयांच्या मोठ्या भांडवलावर चालू असणाऱ्या भारतीय जीवन विमा महामंडळाचा (LIC) वापर दुभती गाय म्हणून केला जात आहे. सरकारच्या निर्गुंतवणुकीचा अजेंडा पूर्ण करण्यासाठी एलआयसीचा उपयोग सरकारी कंपन्यांचा तारणहार म्हणून केला जात आहे.

गेल्या दशकात एलआयसीची सार्वजनिक कंपन्यांमधील गुंतवणूक चौपट झाली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) आकडेवारीनुसार मार्च 2019 पर्यंत एलआयसीने एकूण 26.6 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून त्यापैकी 22.6 लाख कोटी रुपये एकट्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये गुंतविले गेले आहेत, खासगी क्षेत्रात फक्त 4 लाख कोटी रुपये गुंतविले आहेत. अशा प्रकारे सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये एलआयसीच्या एकूण गुंतवणूकीचा वाटा आता एका दशकापूर्वीच्या 75 टक्के तुलनेत आता 85 टक्के झाला आहे. एका दशकात तो 15 टक्क्यांनी वाढला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like