फायद्याची गोष्ट ! LIC पॉलिसी : 150 रुपये खर्च करून मिळवा 19 लाख, गरज असल्यास कधीही पैसे मिळतील परत, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एलआयसी देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. या कंपनीत पॉलिसीमध्ये गुंतवणूक केल्यास ग्राहकांना अनेक फायदे दिले जातात. वाढत्या महागाईत आपल्या सर्वांसाठी हे आवश्यक आहे की, आपल्या मेहनतीच्या कमाईतून काही भाग काहीही करून बचत करून एखाद्या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करावी. प्रत्येकाचे स्वप्न असते की, त्यांच्या मुलांचे भविष्य चांगले असावे. भारतीय आयुर्विमा महामंडळाची (एलआयसी) सुद्धा अशीच एक स्कीम आहे, जी मुलांच्या भविष्यासाठी तयार करण्यात आली आहे. एलआयसी ची ’न्यू चिल्ड्रन्स मनी बॅक प्लॅन’ पॉलिसीबाबत आपण जाणून घेणार आहोत.

या पॉलिसीची वैशिष्ट्ये…

(1) हा विमा घेण्यासाठी किमान वय 0 वर्ष आहे
(2) विमा घेण्याचे कमाल वय 12 वर्ष
(3) किमान विमा रक्कम 1,00,00 रूपये
(4) कमाल विमा रक्कमेची मर्यादा नाही
(5) प्रीमियम वेवर बेनिफिट रायडर – ऑपशन उपलब्ध

* मनी बॅक इन्स्टॉलमेंट – पॉलिसी धारकाला 18, 20 आणि 22 वर्ष वय पूर्ण झाल्यानंतर सम अश्युर्डच्या 20 टक्के रक्कम मिळेल.

* मॅच्युरिटी बेनिफिट – पॉलिसी मॅच्युरिटीच्या वेळी (विमा धारकाचा पॉलिसी कालावधी दरम्यान मृत्यू न झाल्यास) पॉलिसीधारकाला विमा रक्कमेचा उर्वरित भाग 40 टक्के बोनससह मिळेल.

* डेथ बेनिफिट – पॉलिसी कालावधी दरम्यान पॉलिसी धारकाच्या मृत्यूच्या स्थितीत विमा रक्कमेशिवाय ठरलेला बोनस आणि अंतिम अतिरिक्त बोनस दिला जातो. डेथ बेनिफिट एकुण प्रीमियम पेमेन्टच्या 105 टक्केपेक्षा कमी नसेल.