खुपच कामाची ‘ही’ LIC ची बचत विमा योजना, दररोज 28 रूपये बचत करून मिळणार ‘हे’ 6 फायदे, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कमी उत्पन्न असणाऱ्या लोकांसाठी भारतीय जीवन विमा निगम (LIC) ची मायक्रो बचत विमा योजना (Micro Bachat Insurance Policy) खूप उपयोगाची आहे. त्यामुळे ज्या लोकांचे उत्पन्न कमी आहे त्यांच्यासाठी माइक्रो इंश्योरेंस प्लॅन (Micro Insurance Plan) हा खूप फायदेशीर आहे. ही योजना बचत आणि संरक्षण यांचा मेळ साधणारी आहे. आकस्मित मृत्यू झाल्यास या योजनेनुसार कुटुंबाला फायनान्सियल सपोर्ट मिळणार आहे. तसेच पॉलिसी मॅच्युरिटीनंतर सरळ एकरकमी राशी प्रदान करण्यात येणार आहे. चला जाणून घेऊया या प्लॅनबाबत…

१) लोन ची सुविधा मिळणार

मायक्रो बचत नावाच्या या रेगुलर प्रीमियम प्लॅन मध्ये खूप सारी खास वैशिष्ट्ये आहेत. या पॉलिसी मध्ये ५० हजार रुपयांपासून २ लाख रुपयांपर्यंतचा विमा मिळणार आहे. ही नॉन-लिंक्ड विमा योजना आहे. या योजनेंतर्गत आपल्याला पॉलिसीमध्ये लॉयल्टीचा फायदा देखील मिळेल. जर एखाद्याने ३ वर्षांसाठी प्रीमियम दिला असेल तर त्याला मायक्रो बचत योजनेत कर्जाची सुविधा देखील मिळणार आहेत.

२) ही योजना कोण घेऊ शकणार ?

केवळ १८ ते ५५ वर्षे वयोगटातील लोकांना हा विमा मिळेल. या अंतर्गत कोणत्याही वैद्यकीय तपासणीची आवश्यकता राहणार नाही. जर कोणी ३ वर्ष सातत्याने प्रीमियम भरत असेल आणि त्यानंतर तो प्रीमियम भरण्यास असमर्थ असेल तर त्याला ६ महिन्यापर्यंत विम्याची सुविधा सुरू ठेवता येणार आहे. हा प्रीमियम पॉलिसीधारक ५ वर्ष पर्यंत भरत असेल तर त्याला २ वर्षांचे ऑटो कव्हर मिळेल. या योजनेची संख्या ८५१ आहे.

३) पॉलिसीची मुदत किती वर्ष असेल ?

मायक्रो बचत विमा योजना पॉलिसीची मुदत १० ते १५ वर्षे इतकी असणार आहे. या योजनेत प्रीमियम वार्षिक, सहामाही, तिमाही आणि मासिक तत्वावर आपण भरू शकतात. यामध्ये आपणास एलआयसीमध्ये अ‍ॅक्सिडेंटल राइडर जोडण्याची सुविधा देखील मिळेल. तथापि, यासाठी आपल्याला एक स्वतंत्र प्रीमियम भरावा लागेल.

४) दिवसाला २८ रुपयांवर मिळणार २ लाखांचा विमा

याअंतर्गत १८ वर्षांची व्यक्ती जर १५ वर्षाची योजना घेत असेल तर त्याला प्रति हजार ५१.५ रुपये प्रीमियम भरावा लागेल. त्याचबरोबर २५ वर्षांच्या वयासाठी त्याच कालावधीसाठी ५१.६० रुपये आणि ३५ वर्ष वयासाठी प्रति हजार ५२.२० रुपये द्यावा लागणार आहे. १० वर्षांच्या योजनेतील प्रीमियम ८५.४५ ते ९१.९ रुपये प्रति हजार असेल. प्रीमियममध्ये २ टक्क्यांची सूटदेखील असणार आहे. जर आपल्याला खरेदी केल्यानंतर हा विमा पसंत पडला नाही तर आपण १५ दिवसांच्या आत योजना सरेंडर करू शकता. जर ३५ वर्षांच्या व्यक्तीने १ लाख रुपयांची सम अश्योर्ड वाली १५ वर्षाची पॉलिसी घेतली तर त्याचे वार्षिक प्रीमियम ५११६ रुपये असणार आहे. चालू पॉलिसीमध्ये ७० टक्क्यांपर्यंत रकमेचे लोन मिळणार आहे. त्याचवेळी पेड पॉलिसीमध्ये ६० टक्क्यांपर्यंतच्या रकमेसाठी लोन ची पात्रता असेल.

५) हे आहे गणित

जर एखाद्या व्यक्तीने वयाच्या ३५ व्या वर्षी पुढील १५ वर्षांसाठी ही पॉलिसी घेतली असेल तर त्याला वर्षाकाठी ५२.२० रुपये (विम्याच्या रकमेवर १ हजार रुपये) प्रीमियम जमा करावा लागणार आहे. त्याचप्रमाणे जर कोणी २ लाख रुपये विम्याची रक्कम घेतली तर त्याला वर्षाला ५२.२० x १०० x २ म्हणजेच १०,३०० रुपये जमा करावे लागतील. म्हणजेच दिवसाला २८ रुपये आणि महिन्याला ८४० रुपये इतका प्रीमियम भरावा लागेल.

६) कलम ८० सी च्या अंतर्गत प्रीमियम भरण्यासाठी मिळणार सूट

या दरम्यान लोनवर १०.४२ टक्के दराने व्याज दिले जाईल. प्रीमियम भरण्यासाठी १ महिन्याची सूट असेल. या पॉलिसीचे मॅच्युरिटीचे कमाल वय ७० वर्षे असेल. ही लाइफ इन्शुरन्स पॉलिसी आहे, त्यामुळे तुम्हाला प्रीमियम पेमेंटवर कलम ८० सी अंतर्गत आयकरात सूट देखील मिळणार आहे.

फेसबुक पेज लाईक करा –

You might also like