LIC IPO च्या प्रतीक्षेत असलेल्या लोकांनी लक्ष द्यावे, मे पर्यंत पुढे ढकलला जाऊ शकतो ‘पब्लिक इश्यू’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – LIC च्या IPO ची वाट पाहत असलेल्या लोकांना ही बातमी निराश करणारी असू शकते. केंद्र सरकार मे महिन्याच्या मध्यात आपल्या सर्वात मोठ्या विमा कंपनीचा मेगा IPO आणण्याच्या विचारात आहे असे ऐकले आहे. (LIC IPO)

 

या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळालेला नसला तरी ब्लूमबर्गच्या अहवालाचा संदर्भ देत मनीकंट्रोलने लिहिले आहे की, सरकारला आशा आहे की तोपर्यंत रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे बाजारात निर्माण झालेली अस्थिरतेची स्थिती शांत होईल. नियमांनुसार, आयपीओसाठी Life Insurance Corporation (LIC) द्वारे प्रकाशित एम्बेडेड व्हॅल्यू मे पर्यंत वैध असेल.

 

यात म्हटले आहे की, यापलीकडे विलंब झाल्यास, एलआयसीच्या एम्बेडेड व्हॅल्यूची पुन्हा गणना करावी लागेल. विमा कंपन्यांची व्हॅल्यू एम्बेडेड व्हॅल्यूच्या आधारावर काढली जाते. (LIC IPO)

 

रशिया-युक्रेन युद्धामुळे काम बिघडले
याआधी असे वृत्त होते की हा आयपीओ मार्च अखेर लाँच होणार आहे. वाढत्या अर्थसंकल्पीय तुटीला (budget deficit) वित्तपुरवठा करण्यासाठी सरकारी मालमत्ता विकण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या योजनेचा हा एक महत्त्वाचा भाग आहे.

 

या महिन्याच्या सुरुवातीला प्रकाशित झालेल्या ब्लूमबर्ग न्यूजच्या रिपोर्टनुसार, रशिया-युक्रेन युद्धामुळे बाजारातील वातावरण बिघडले होते,
ज्यामुळे देशातील सर्वात मोठा आयपीओ पुढील आर्थिक वर्षासाठी पुढे ढकलला गेला आहे. अर्थ मंत्रालयाच्या प्रवक्त्याने यावर कोणतेही भाष्य केलेले नाही.

फेब्रुवारीमध्ये अस्थिरता वाढली
दुसर्‍या सूत्राने सांगितले की सरकारी आयपीओ लाँच करण्यासाठी बाजार अस्थिरता निर्देशांक (market volatility index) 15 वर असेल तर तो एक सहज स्तर असेल.
एनएसई अस्थिरता निर्देशांक सोमवारी 26 वर होता, जो गेल्या वर्षीच्या 17.9 च्या सरासरीपेक्षा खूप जास्त होता.
या आर्थिक वर्षात 24 फेब्रुवारी रोजी तो 31.98 च्या सर्वोच्च पातळीवर गेला होता.

 

विशेष म्हणजे, विमा कंपनीतील 5 टक्के हिस्सा विकून सरकारला सुमारे 65,400 कोटी रुपये उभे करायचे आहेत.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी फेब्रुवारी 2020 मध्ये प्रथम आयपीओ योजना जाहीर केली,
परंतु साथीच्या रोगामुळे ती पुढे ढकलण्यात आली.

 

Web Title :- LIC IPO | lic ipo likely to come in may govt to wait for markets to calm down

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Nia Sharma Superbold Selfie | निया शर्माचा ‘हा’ सेल्फी पाहताच चाहत्यांना लागलं वेड, फोटोनं सोशल मीडियावर केला कहर

 

Chitra Wagh | ‘मुख्यमंत्री महोदय हीची पूजा चव्हाण होऊ देऊ नका’, चित्रा वाघ यांचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल

 

Shamita Shetty And Raquesh Bapat Breakup | अभिनेत्री शमिता शेट्टी आणि अभिनेता राकेश बापट यांचे ब्रेकअप झाले का?, दोघांनी केला खुलासा