LIC IPO मुळे नुकसान ! दुसर्‍या मार्गाने गुंतवणुकदारांना खुश करू शकते सरकार, हा आहे प्लान B

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – LIC IPO | सरकारी विमा कंपनी एलआयसीच्या आयपीओ (LIC IPO) ची भलेही खूप चर्चा झाली असेल, पण त्याची कामगिरी विशेष ठरली नाही. सुरुवातीला कंपनीचे शेअर्स सवलतीच्या दरात लिस्ट केले गेले, त्यानंतर त्याची किंमत सातत्याने घसरत गेली. त्यामुळे गुंतवणूकदारांची घोर निराशा झाली.

 

आता एलआयसीच्या अशा गुंतवणूकदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कंपनी या महिन्यात आपला पहिला तिमाही निकाल (LIC Result) प्रसिद्ध करणार आहे आणि त्यात गुंतवणूकदारांसाठी लाभांश (LIC Dividend) देखील जाहीर केला जाणार आहे.

 

या दिवशी येईल पहिल्या तिमाहीचा निकाल
एलआयसीने (BSE) ला सांगितले की ते 30 मे रोजी पहिल्या तिमाहीचा निकाल जाहीर करणार आहेत. त्यात म्हटले आहे की ते 30 मे रोजी मार्च तिमाहीच्या ऑडिटेड फायनान्शियल रिझल्टवर विचार करतील आणि त्यास मंजूरी देतील.

याशिवाय गुंतवणूकदारांना लाभांश द्यायचा असेल तर तोही 30 मे रोजी मंजूर केला जाईल.

 

सध्या इश्यू प्राईसपेक्षा इतका खाली आहे शेअर
मंगळवारी एलआयसीचा शेअर दिवसभराच्या व्यवहारात बीएसईवर 1.59 टक्क्यांच्या वाढीसह 829.85 रुपयांवर व्यवहार करत होता. तो अजूनही इश्यू किमतीपेक्षा (LIC IPO Issue Price) 12.55 टक्क्यांनी खाली आहे.

एलआयसी आयपीओसाठी किंमत 902 – 949 रुपये निश्चित करण्यात आली होती. जवळपास 9 टक्के सूट देऊन कंपनीचा शेअर बाजारात लिस्ट झाला. (LIC IPO)

एलआयसीच्या आयपीओचा आकार (LIC IPO Size) रु. 20,557 कोटी होता आणि तो 2.95 पट सबस्क्राइब झाला होता. सध्या कंपनीचे एमकॅप रु 5,24,626.93 कोटी आहे.

यामुळे बंपर लाभांश अपेक्षित
शेअरच्या किमतीत घसरण झाल्यानंतरही एलआयसीच्या गुंतवणूकदारांना (LIC Investors) फायदा होऊ शकतो,
असे विश्लेषक सांगत आहेत. गेल्या वर्षीही कंपनीने लाभांश दिला नाही.

एलआयसीचे 25 टक्के शेअर्स विकण्याची सरकारची योजना आहे आणि आयपीओमधून फक्त 3.5 टक्के भागीदारी विकली जाऊ शकते,
सरकार आगामी काळात FPO (LIC FPO) आणू शकते.

गुंतवणूकदारांनी एफपीओ मोठ्या प्रमाणात घेण्यासाठी, ज्यांचे आयपीओमध्ये पैसे आहेत त्यांना नफा होणे आवश्यक आहे.
यामुळे, एलआयसीच्या गुंतवणूकदारांना बंपर लाभांश मिळण्याची अपेक्षा आहे.

 

Web Title :- LIC IPO | lic to announce maiden financial result this month shareholders to get dividend lic ipo

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा