LIC IPO Price | गुंतवणूकदारांसाठी महत्वाची बातमी ! एलआयसीच्या IPO साठी इतकी असेल एका शेअरची किंमत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – LIC IPO Price | देशातील सर्वात मोठी कंपनी म्हणजे भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच Life Insurance Corporation of India (LIC) आहे. एलआयसीच्या IPO ची प्रतिक्षा करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी (Investors) महत्वाची माहिती समोर आली आहे. तसेच इनिशियल पब्लिक ऑफरचा Initial Public Offering (IPO) प्राइस बँडही (LIC IPO Price) समोर आला आहे. LIC ने घेतलेल्या महत्वपूर्ण बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

 

एलआयसीने त्यांच्या इनिशियल पब्लिक ऑफरसाठी 902 रुपये ते 949 रुपये प्रति शेअर किंमत निश्चित केली आहे. त्याचबरोबर LIC आपल्या पॉलिसीधारकांना 60 रुपयांची सूट देणार आहे. तसेच, किरकोळ गुंतवणूकदार आणि कर्मचाऱ्यांना 40 रुपयांची सूट दिली जाईल. असं सूत्रांकडून सांगितलं आहे. (LIC IPO Price Band)

 

IPO या तारखेला उघडण्याची अपेक्षा –

विमा कंपनीने (LIC) चा IPO 4 मे रोजी सुरु होण्याची अपेक्षा आहे. ही समस्या 9 मे रोजी बंद होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. (LIC IPO Price)

दरम्यान, सरकारने फेब्रुवारीत दिग्गज विमा कंपनीतील आपले 5 टक्के स्टेक अथवा 316 कोटी शेअर्स विकण्याचे जाहीर केले होते. सरकारने सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाकडे (SEBI) याबाबत कागदपत्रेही सादर केले. परंतु, रशिया – युक्रेन (Russia – Ukraine) युद्धामुळे बाजारातील अस्थिरतेचा परिणाम आयपीओच्या नियोजनावर देखील झाले. आठवड्यामध्ये इश्यूचा आकार 5 टक्क्यांवरून 3.5 टक्क्यांवर आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

सरकारला 21 हजार कोटी मिळणार –
IPO द्वारे सरकार सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी LIC मधील 3.5 टक्के हिस्सा विकणार आहे.
त्यामुळे सरकारला 21 हजार कोटी रुपये मिळणार आहेत. IPO वर आधारित, LIC चे मूल्यांकन 6 लाख कोटी रुपये आहे.
5 टक्के भागविक्रीच्या नियमातून सवलत मिळण्यासाठी सरकारने सेबीला कागदपत्रेही दिली असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
दरम्यान, सेबीच्या नियमांनुसार 1 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक मूल्यांकन असलेल्या कंपन्यांना IPO मधील 5 टक्के हिस्सा विकणे गरजेचे असते.

 

Web Title :- LIC IPO Price | lic ipo price band latest update set at rs 902 and 949 per share says sources

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा