एकदाच पैसे द्या आणि आयुष्यभर प्रत्येक महिन्याला मिळवा 36000 रुपये पेन्शन, जाणून घ्या LIC च्या खास स्कीमबाबत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील सर्वांत मोठी विमा कंपनी म्हणजेच भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) आपली एक खूप प्रसिद्ध विमा पॉलिसी जीवन अक्षय पॉलिसी बंद केली होती, परंतु आता पुन्हा एकदा ती सुरू केली जात आहे. एलआयसी जीवन अक्षय पॉलिसीअंतर्गत पॉलिसीधारकाला केवळ एकदाच हप्ता दिल्यानंतर आयुष्यभर पेन्शनचा लाभ घेण्याची संधी मिळते.

कमाल गुंतवणुकीची मर्यादा नाही
जीवन अक्षय पॉलिसी सिंगल प्रीमियम नॉन-लिंक्ड नॉन-पार्टिसिपेटिंग आणि पर्सनल एन्युटी प्लॅन आहे. यामध्ये कमीत कमी 1,00,000 रुपयांची गुंतवणूक करून पॉलिसी करू शकता. या पॉलिसीमध्ये कमाल गुंतवणुकीची कोणतीही मर्यादा नाही.

जर कुणी व्यक्ती या पॉलिसीमध्ये किमान 1 लाख रुपये गुंतवणूक करत असेल, तर त्यास 12,000 रुपये वार्षिक पेन्शन मिळेल. याचा अर्थ एकदा 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीत प्रत्येक वर्षी 12,000 रुपये पेन्शन म्हणून मिळतील. कमाल गुंतवणुकीची कोणतीही मर्यादा नसल्याने पॉलिसीधारक यामध्ये आपल्या इच्छेनुसार कितीही गुंतवणूक करू शकतो. पेन्शनची रक्कम गुंतवणुकीच्या रकमेवर आधारित असेल.

काय आहे पात्रता?
ही पॉलिसी 35 वर्षे ते 85 वर्षांच्या वयाचे लोक घेऊ शकतात. याशिवाय दिव्यांग व्यक्तीसुद्धा या पॉलिसीचा लाभ घेऊ शकतात. या पॉलिसीत पेन्शन रक्कम कशाप्रकारे प्राप्त करायची आहे, यासाठीसुद्धा 10 पर्याय दिले जातात.

कशाप्रकारे दर महिन्याला मिळेल 36 हजार रुपयांची पेन्शन?
जीवन अक्षय पॉलिसीचा (Annuity payable for life at a uniform rate) पर्याय निवडून या पॉलिसीत एकरकमी गुंतवणूक करून तुम्ही दर महिन्याला 36 हजार रुपयांची पेन्शन मिळवू शकता. उदाहरणार्थ जर कुणी 45 वर्षांचा व्यक्ती हा प्लॅन निवडत असेल आणि सोबतच 70,00,000 रुपयांचा सम अ‍ॅश्युअर्ड पर्याय निवडला तर त्यास 71,26,000 रुपयांच्या प्रीमियमची एकरकमी पैसे भरावे लागतील. या गुंतवणुकीनंतर त्यास दरमहा 36,429 रुपयांची पेन्शन मिळेल. मात्र, मृत्यूनंतर ही पेन्शन बंद होईल. एलआयसीच्या जीवन अक्षय पॉलिसीमध्ये अशाप्रकारचे अनेक प्लॅन आहेत.