दररोज 22 रूपयांची बचत करून घ्या ‘ही’ LIC ची पॉलिसी, अधिक नफ्यासह होणार ‘हे’ 4 फायदे, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काही काळापूर्वीच लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (LIC) स्वस्त, पारंपारिक आणि  संरक्षण मुदत विमा योजना ‘जीवन अमर’ सुरू केली असून, ग्राहकांनी महागड्या योजना दिल्याच्या तक्रारी दूर केल्या आहेत. एलआयसी जीवन अमर योजनेअंतर्गत दोन डेथ बेनेफिट्स ऑप्शन्स,  सम अ‍ॅश्योर्ड आणि इन्क्रीजिंग सम अ‍ॅश्योर्ड यापैकी एक सुविधा मिळते. योजना केवळ विक्रीसाठी ऑफलाइन उपलब्ध असेल. म्हणजेच एजंटद्वारेच ती खरेदी केली जाऊ शकते. एलआयसीचा जीवन अमर योजना  केवळ स्वस्त नाही तर त्यात आणखीही अनेक वैशिष्ट्ये आहेत जी या योजनेला खास  बनवतात.


जाणून घेऊ LIC च्या ‘जीवन अमर’ प्लॅनबद्दल-

10 वर्षापासून ते 40 वर्षापर्यंतची  पाॅलिसी टर्म –
LIC चा जीवन अमर प्लॅन 18 ते 65 वर्षांच्या व्यक्ती घेऊ शकताच. जास्तीत जास्त वयोमर्यदा  वय 80 वर्ष आहे. जीवन अमरची पाॅलिसी टर्म 10 वर्ष ते 40 वर्षापर्यंत असेल.


हप्त्यामध्ये फरक-
धुम्रपान करणाऱ्या  आणि धुम्रपान न करणाऱ्या  यांच्या हप्त्यांमध्ये(प्रीमियम) फरक असेल. सिगरेट ओढणाऱ्यांचा प्रीमियम जास्त असेल.पुरुष आणि स्त्रियांसाठी प्रीमियमची रक्कम भिन्न असेल. पुरुषांचा प्रीमियम महिलांपेक्षा जास्त असेल.

प्रीमियम भरण्यासाठी हे पर्याय उपलब्ध असतील

एलआयसीची जीवन अमर योजना प्रीमियम पेमेंटसाठी तीन पर्याय देईल. सिंगल प्रीमियम, रेग्युलर प्रीमियम आणि लिमिटेड प्रीमियम. लिमिटेड प्रीमियम अंतर्गत प्रीमियम पेमेंट टर्म (पीपीटी), पॉलिसीची मुदत 5 वर्षांपेक्षा कमी आणि द्वितीय पॉलिसीची मुदत 10 वर्षांपेक्षा कमी असेल. तथापि, प्रीमियम भरण्यासाठी कमाल वय केवळ 70 वर्षे असेल. नियमित आणि मर्यादित प्रीमियम पर्यायांतर्गत किमान प्रीमियम हप्ता 3000 रुपये असेल. तर  सिंगल प्रीमियम पर्यायांतर्गत किमान प्रीमियम हप्ता 30,000 रुपये ठेवण्यात आला आहे.

visit : Policenama.com