LIC Jeevan Anand Policy | एलआयसीच्या ‘या’ पाॅलिसीत मिळवा अधिक रिटर्न्स ! दररोज जमा करा 47 रुपये अन् मिळवा 25 लाख, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – LIC Jeevan Anand Policy | भविष्याचा विचार करता अनेकजण आतापासूनच गुंतवणूकीला (Investment) प्राधान्य देत असतात. त्यामुळे पैशाची बचत करणे अधिक महत्वाचे आहे. गुंतवणूकीचे अनेक पर्याय उपलब्ध असले तरी अधिकाधिक लोक एलआयसीला (LIC) प्राधान्य देत असतात. भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच एलआयसी होय. हे आपल्या ग्राहकांना अनेक पर्यात देत असतात. यामध्ये केलेली गुंतवणूक अगदी सुरक्षित असते. जीवन आनंद पॉलिसी ही एक एलआयसीची योजना आहे. यामध्ये कमी गुंतवणूकीवर अनेक फायदे मिळेल. जीवन आनंद ही पॉलिसी (LIC Jeevan Anand Policy) दीर्घकाळ चालणारी आहे.

 

जीवन आनंद पॉलिसी मध्ये (LIC Jeevan Anand Policy) प्रीमियम टर्म (Premium Term) आणि पॉलिसी टर्म (Policy Term) दोन्हीही सारखेच असतात.
याचा अर्थ असा की, जितक्या मुदतीची तुमची पॉलिसी आहे तोपर्यंत तुम्ही प्रीमियम पेमेंट करू शकणार आहे.
या पॉलिसीत महिन्याकाठी जर तुम्ही 1400 रुपये जमा केले तर तुम्हाला अखेर 25 लाख रुपयांपर्यंत परतावा मिळणार आहे.
म्हणजेच तुम्ही केवळ 47 रुपयांची गुंतवणूक करून लाखो रुपये मिळवू शकणार आहात.

 

समजा वयाच्या 35 व्या वर्षी पुढील 35 वर्षांसाठी 5 लाख रुपयांचा इन्शुरन्स घेतला तर तुम्हाला 16,300 रुपये वार्षिक हप्ता भरावा लागणार आहे.
6 महिने, 3 महिने किंवा 1 महिना, अशा कालावधीतही तुम्हाला तुमचा प्रीमियम सेट करून घेता येऊ शकतो.
35 वर्षांत तुम्हाला एकूण 5 लाख 70 हजार रुपये जमा करावे लागतील. म्हणजे महिन्याकाठी 1400 रुपये जमा केल्यास तुम्हाला मॅच्युरिटीनंतर 25 लाख रुपये मिळणार आहे.
यापैकी, 5 लाख रुपये ही बेसिक अश्योर्ड सम (Basic Assured Sum) असेल तर, रिव्हिजनरी बोनस (Revisionary Bonus) म्हणून 8 लाख 60 हजार रुपये आणि फायनल अ‍ॅडिशनल बोनस म्हणून 11 लाख 50 हजार रुपये मिळणार आहेत.

दोनवेळा मिळेल बोनस –
या पॉलिसीमध्ये दोनदा बोनस मिळतो आहे. परंतु, त्यासाठी पॉलिसी 15 वर्षे जुनी झालेली असावी.
तसेच, जर पॉलिसी होल्डरचा (Policy Holder) मृत्यू झाला तर नॉमिनीला पॉलिसीच्या 125 टक्के डेथ बेनिफिट (Death Benefit) मिळतो.
पॉलिसीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर पॉलिसी होल्डरचा (Policy Holder) मृत्यू झाला तर नॉमिनीला अश्योर्ड सम इतकी रक्कम दिली जातेय.

 

सवलत कुठे मिळेल ?
या पॉलिसीमध्ये किमान 1 लाख रुपयांची रक्कम ही अश्योर्ड असते. अधिकाधिक एश्योर्ड समला कुठलीही मर्यादा नाही.
जीवन आनंद पॉलिसीमध्ये (LIC Jeevan Anand Policy) 4 रायडर्स असतात.
अपघाती मृत्यू आणि अपंगत्व रायडर (Accidental Death and Disability Rider), अपघात लाभ रायडर (Accident Benefit Rider),
न्यू टर्म अ‍ॅश्युरन्स रायडर (New Term Assurance Rider) आणि न्यू क्रिटिकल इलनेस बेनिफिट रायडर (New Critical Illness Benefit Rider) इत्यादींचा त्यामध्ये समावेश होतो. यात आयकर (Income Tax) सवलतीचा लाभ घेता येतो.

 

Web Title :- LIC Jeevan Anand Policy | lic policy benefits lic jeevan anand policy get 25 lakh fund by investing 47 rupees daily

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा