LIC ची जबरदस्त योजना ! दररोज करा 233 रुपयांची गुंतवणूक अन् मिळवा 17 लाख रुपये, जाणून घ्या Policy

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय जीवन विमा कंपनी (LIC) हि ग्राहकांसाठी भविष्याच्या आणि फायद्याच्या अनेक विविध योजना तयार करत असते. अनेक परिस्थितीनुसार योजना आखल्या जातात. तर आताच्या नव्या योजनेनुसार रोज २३३ रुपयाची गुंतवणूक करून काही वर्षांमध्ये जवळपास १७ लाख रुपयाची मिळकत होणार आहे. याबाबत जाणून घ्या.

जीवन लाभ – ९३६ असे या LIC च्या योजनेचं नाव आहे. नॉन-लिंक्ड योजना आहे. अर्थात, या योजनेचा शेअर मार्केटच्या चढ-उतारांशी काहीही संबंध नाही. हा एक मर्यादित प्रीमियम योजना आहे. यामुळे मुलांचे लग्न, उच्च शिक्षण, मालमत्ता खरेदी इ. अशा कामासाठी उपयोगी व्हावे यावरुन ही योजना आखण्यात आलीय.

या योजनेबाबत महत्त्वाचे मुद्दे –
> जीवन लाभ ही योजना नफा आणि सुरक्षितता या दोन्हीही बाबी देते.

> ८ ते ५९ वर्षांपर्यंतच्या व्यक्तींसाठी ही योजना घेता येते.

> १६ ते २५ वर्षांच्या मुदतीसाठी ही योजना घेता येते.

> कमीत कमी २ लाख रुपयांचा विमा या योजनेच्या माध्यमातून काढावा लागतो, परंतु, अधिक रकमेची मर्यादा नाही.

> या योजनेचे हप्ते ३ वर्षांपर्यंत भरले, तर त्यानंतर पॉलिसीवर कर्ज घेण्याची सुविधा उपलब्ध आहे.

> या योजनेच्या हप्त्यांवर कर सवलत (Tax relief) मिळते. त्याचप्रमाणे पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास वारसाला विम्याची रक्कम, तसेच बोनस मिळतो.

जर पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास –
पॉलिसीच्या कालावधीत पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला आणि त्याने मृत्यू होइपर्यंतचे सर्व हप्ते नियमितपणे भरले असतील, तेव्हा त्याच्या मृत्यूनंतर वारसाला विम्याची रक्कम, साधा प्रत्यावर्ती बोनस आणि अंतिम आवृत्ती बोनस असेल तर दिला जातो. अर्थात, वारसाला विमा रकमेपेक्षा अधिक रक्कम मिळते.

Also Read This : 

Pune : पुण्यात रुग्णवाहिकांसाठीचे नवे दर निश्चित

 

तोंड आल्यावर करा ‘हे’ घरगुती उपाय ; जाणून घ्या

 

भाजपच्या महिला खासदारावर हल्ला; जिल्हाधिकाऱ्यांनीही उचलला नाही फोन Video

 

अशक्तपणा दूर करण्यासाठी करा घरगुती उपाय