LIC Jeevan Lakshya Policy | ‘या’ पॉलिसीमध्ये दिवसाला करा 172 रुपयांची बचत; मॅच्युरिटीनंतर मिळतील 28.5 लाख

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – LIC Jeevan Lakshya Policy | एलआयसी म्हणजेच लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन Life Insurance Corporation (LIC) ही देशातील सर्वात मोठ्या विमा (LIC Policy) कंपन्यांपैकी एक आहे. आजही देशात एक मोठा वर्ग आहे, जो आपले पैसे एलआयसीमध्ये गुंतवण्यास प्राधान्य देतो. याचे मोठे कारण म्हणजे गुंतवणूकदारांना (Investors) चांगला परतावा (Refund) मिळतो. तसेच गुंतवणूकदारांना त्यांच्या पैशांची सुरक्षितता वाटते. एलआयसीत पैसे बुडण्याचा धोका कमी आहे, कारण तुमचे पैसे परत करण्याची हमी सरकार घेते. (LIC Jeevan Lakshya Policy)

 

एलआयसी देशातील प्रत्येक घटकाच्या गरजेनुसार वेगवेगळ्या पॉलिसी घेऊन येत असते. त्यापैकी एक एलआयसी जीवन लक्ष्य पॉलिसी (LIC Jeevan Lakshya Policy) आहे. या पॉलिसीत, तुमच्या अत्यंत कमी गुंतवणुकीवर बंपर परताव्याची हमी दिली जाते. एलआयसी जीवन लक्ष्य पॉलिसी ही एक जीवन विमा योजना (Life Insurance Plan) आहे, ज्यामध्ये पॉलिसीधारकाला वार्षिक उत्पन्न लाभ मिळतो. मुलांच्या गरजा लक्षात घेऊन ही पॉलिसी तयार करण्यात आली आहे.

तर नॉमिनीला पैसे दिले जातात
पॉलिसी पूर्ण होण्यापूर्वी पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास, पैसे नॉमिनीला (Nominee) दिले जातात. महत्वाचे म्हणजे नॉमिनीला मॅच्युरिटीची (Maturity) पूर्ण रक्कम मिळते. यामध्ये विमाधारकाला किमान एक लाख रुपयांची विमा रक्कम मिळते. विमाधारक ही योजना 13 ते 25 वर्षाच्या दरम्यान घेऊ शकतो. या विम्यामध्ये तुम्ही1,3,6,12 महिन्यांच्या कालावधीसाठी प्रीमियम जमा करु शकता. तुम्ही ही पॉलिसी कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 50 वर्षांसाठी घेऊ शकता. तसेच तुम्ही त्याची मॅच्युरिटी रक्कम कमाल वयाच्या 65 वर्षापर्यंत घेऊ शकता.

 

172 रुपये गुंतवा 28.5 लाख मिळवा
जर तुम्ही वयाच्या 30 व्या वर्षी 25 वर्षांचा प्लॅन निवडला तर तुम्हाला मॅच्युरिटीवर जवळपास 28.5 लाख रुपये मिळतील.
यासाठी तुम्हाला दरमहा 5,169 रुपये जमा करावे लागतील, म्हणजेच तुम्हाला दररोज 172 रुपये गुंतवावे लागतील.
यानंतर वयाच्या 55 व्या वर्षी तुम्ही संपूर्ण 28.5 लाख रुपयांचे मालक व्हाल.
विशेष म्हणजे, पॉलिसीच्या शेवटच्या तीन वर्षांसाठी तुम्हाला कोणताही प्रीमियम भरावा लागणार नाही.

 

Web Title :- LIC Jeevan Lakshya Policy | lic jeevan lakshya policy invest 172 rupees per day and get 28 5 lakh rupees at maturity

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा