LIC Jeevan Mangal | केवळ 60 रुपयांत सुरू करा ‘एलआयसी’ची ‘ही’ पॉलिसी, मॅच्युरिटीवर मिळेल संपूर्ण प्रीमियम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – न्यू जीवन मंगल (LIC Jeevan Mangal) ही एलआयसीची एक मायक्रो इन्शुरन्स पॉलिसी आहे. यामध्ये योजनेची मुदत संपल्यावर भरलेला संपूर्ण प्रीमियम परत मिळतो. केवळ 60 रुपयांच्या प्रीमियमवर या योजनेत अकाली मृत्युचा विमा मिळतो. जर विमाधारकाचा अचानक मृत्यू झाला किंवा अपंगत्व आले तर एलआयसी (LIC Jeevan Mangal) आर्थिक मदत देते.

काय आहेत बेनिफिट
विमाधारकाची रेग्युलर विमा पॉलिसी असेल तर वारसांना भरलेल्या वार्षिक प्रीमियमच्या सातपट म्हणजे 105 टक्के रक्कम मिळते.

सिंगल प्रीमियम भरला असेल आणि विमाधारकाचा पॉलिसी कालावधीत मृत्यू झाला तर विमा रकमेच्या कमाल 125 टक्के रक्कम मिळते.

कोण घेऊ शकतात ही पॉलिसी –

विमाधारकाचे वय किमान 18 वर्षे आणि कमाल वय 55 वर्ष असावे.

वयाच्या 65 वर्षी पॉलिसी मॅच्युअर होते. किमान 10 हजार रुपये आणि कमाल 50 हजार रुपये सम अश्युअर्ड आहे.

ही पॉलिसी रेग्युलर प्रीमियम आणि सिंगल प्रीमियम अशा दोन प्रकारे घेऊ शकता.

20 हजार रुपयांच्या 10 वर्षांच्या सम अश्युअर्ड पॉलिसीसाठी दरवर्षी 1191 रुपयांचा प्रीमियम भरावा लागेल.

Web Titel :- term insurance lic jeevan mangal policy per month deposit 60 rs check details

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Central Railway News | मध्य रेल्वेच्या 11 कर्मचाऱ्यांचा ‘महाव्यवस्थापक सुरक्षा’ पुरस्काराने सत्कार

Pune News | रिलायंस रिटेल लिमिटेडला ग्राहक आयोगाचा दणका ! मोबाइल घेण्यापूर्वीच वॉरंटीचा कालावधी सुरू झाल्याचे ग्राहकाला सांगितले

Sangli Anti Corruption | 1000 रुपयाची लाच घेताना ग्रामविकास अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात