LIC Jeevan pragati | LIC च्या ‘या’ पॉलिसीमध्ये तुम्ही दररोज 200 रुपये गुंतवल्यास मिळेल लाखोंचा फंड, जाणून घ्या मॅच्युरिटी कालावधी आणि इतर डिटेल्स

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – LIC Jeevan pragati | भारतीय आयुर्विमा महामंडळ ही देशातील सर्वात मोठी आणि विश्वसनीय विमा कंपनी आहे. यामध्ये केलेली गुंतवणूक सुरक्षित आणि खात्रीशीर परतावा देते. तसेच एलआयसी सर्व वर्गातील लोकांनुसार पॉलिसी लॉन्च करते. यामुळे मोठ्या संख्येने लोक एलआयसी पॉलिसींमध्ये (LIC Policy) गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. जीवन प्रगती योजना (LIC Jeevan pragati) ही LIC ची कमी गुंतवणूक योजना आहे. दररोज 200 रुपये गुंतवणूक करून, तुम्ही मॅच्युरिटी पर्यंत 28 लाखापर्यंत निधी जोडू शकता. चला तर जाणून घेऊया LIC च्या जीवन प्रगती योजनेबद्दल…

 

कशी आणि किती गुंतवणूक करावी –
LIC च्या जीवन प्रगती योजनेत, दररोज 200 रुपये म्हणजेच मासिक 6 हजार रुपये गुंतवून 28 लाखांचा निधी जोडला जाऊ शकतो. यासाठी तुम्हाला 20 वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागेल. तुमची पॉलिसी (LIC Policy) मॅच्युअर झाल्यावर तुमच्याकडे २८ लाख रुपये असतील. याशिवाय एलआयसीच्या या पॉलिसीमध्ये रिस्क कव्हर देखील उपलब्ध आहे. (LIC Jeevan pragati)

 

नॉमिनीचा पर्याय –
एलआयसीच्या जीवन प्रगती योजनेत, पॉलिसीधारकाकडे नॉमिनीचा पर्याय असतो. पॉलिसीधारकाचा कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास. तर यामध्ये नॉमिनीला पॉलिसीचे पैसे मिळतात. तसेच, या पॉलिसीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते दर 5 वर्षांनी जोखीम संरक्षण प्रदान करते, ज्यामुळे तुमची रक्कम वाढते.

जीवन प्रगती पॉलिसीचे वैशिष्ट्ये.

एलआयसीच्या या पॉलिसीमध्ये किमान 12 वर्षे आणि कमाल 20 वर्षांसाठी गुंतवणूक करता येते.

पॉलिसीधारक जास्तीत जास्त वयाच्या ४५ वर्षापर्यंत गुंतवणूक करू शकतो.

हे नॉन-लिंक्ड, बचत आणि सुरक्षिततेचा फायदा देते.

यामध्ये प्रीमियम वार्षिक, त्रैमासिक आणि सहामाही आधारावर द्यावा लागेल.

विम्याची रक्कम म्हणून किमान 5 लाख रुपये गुंतवू शकतात.

गुंतवणुकीची जास्त मर्यादा नाही.

३ वर्षांचा प्रीमियम भरल्यानंतर सरेंडर व्हॅल्यूही घेता येईल.

 

कव्हरेज कसे वाढते ?
समजा कोणत्याही गुंतवणूकदाराने 2 लाखांची पॉलिसी घेतली तर डेथ बेनिफिट कव्हरेज पहिल्या 5 वर्षांसाठी सारखेच राहील. तसेच 6 ते 10 वर्षांसाठी कव्हरेज 2.5 लाख रुपये असेल. 10 ते 15 वर्षात कव्हरेज 3 लाखांपर्यंत वाढेल. पॉलिसी घेतल्यानंतर 16 ते 20 वर्षांच्या दरम्यान एखाद्याचा मृत्यू झाल्यास, त्यांना 4 लाख रुपयांचे कव्हरेज दिले जाईल.

 

Web Title :- LIC Jeevan pragati | lic invest rs 200 daily in this policy get lakhs of funds know maturity period and other details

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा