LIC Jeevan Pragati Plan | दररोज केवळ 200 रुपये वाचवून बनवा 28 लाख रुपयांचा मोठा फंड, जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – LIC Jeevan Pragati Plan | जर तुम्ही नियोजनबद्ध पद्धतीने गुंतवणूक (Investment) केली तर त्यावर चांगला परतावा तर मिळतोच पण जोखीमही कमी असते. भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIC) अशीच एक विशेष योजना सादर केली आहे, तिचे नाव आहे LIC जीवन प्रगती योजना (LIC Jeevan Pragati Plan). ही योजना अशा लोकांसाठी आहे जे जोखमीमुळे शेअर मार्केट, म्युच्युअल फंड आणि क्रिप्टोकरन्सी इत्यादींमध्ये गुंतवणूक करण्यास घाबरतात.

 

एलआयसीच्या या प्लॅनमध्ये पैसे गुंतवून तुम्ही मॅच्युरिटीच्या वेळी चांगला परतावा मिळवू शकता. विशेष म्हणजे प्लान खरेदी केल्यावर बचत आणि सुरक्षितता दोन्हीची हमी दिली जाते. या दृष्टीने देशातील सर्वात मोठ्या विमा कंपनीची ही योजना गुंतवणुकीचा चांगला पर्याय ठरू शकते.

 

करावी लागेल 20 वर्षांसाठी गुंतवणूक
LIC च्या या प्लॅनमध्ये दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करून तुम्ही भरपूर कमाई करू शकता.
यामध्ये दररोज 200 रुपये गुंतवावे लागतील. तुम्ही सलग 20 वर्षे पैसे गुंतवल्यास, मॅच्युरिटीवर 28 लाख रुपयांचा एकरकमी फंड मिळेल.
ही रक्कम भविष्यातील मोठ्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी वापरली जाऊ शकते.

जीवन विम्यासह डेथ बनिफिट सुविधा
एलआयसीच्या जीवन प्रगती योजनेत तुम्हाला जीवन विम्यासोबत जोखमीचाही लाभ मिळेल.
याशिवाय तुम्ही तुमचा प्रीमियम नियमितपणे भरत असाल तर या प्लॅनमध्ये डेथ बेनिफिटची सुविधाही उपलब्ध आहे. (LIC Jeevan Pragati Plan)

 

दर पाच वर्षांनी यामध्ये वाढ होत राहते. म्हणजे पाच वर्षानंतर जेवढी रक्कम आधी मिळणार होती, त्यापेक्षा जास्त मिळते.

 

विमाधारकाच्या मृत्यूनंतर नॉमिनीला 100% रक्कम
पॉलिसी खरेदी केल्यानंतर पाच वर्षानंतर, विमाधारकाचा कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास,
नॉमिनी (Nominee) ला या योजनेअंतर्गत मूळ विम्याच्या रकमेच्या (Sum Assured) 100% रक्कम मिळेल.
6-10 वर्षांच्या आत मृत्यू झाल्यास, नॉमिनीला विमा रकमेच्या 125 टक्के रक्कम मिळेल.

11-15 वर्षांच्या आत मृत्यू झाल्यास, विमा रकमेच्या 150 टक्के आणि 16-20 वर्षांच्या आत मृत्यू झाल्यास, विमा रकमेच्या 200% रक्कम प्राप्त होईल.

 

 

Web Title :- LIC Jeevan Pragati Plan | invest rs 200 daily in lic jeevan pragati scheme to get 28 lakh on maturity

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Demat Account Increased in India | लॉकडाऊन आणि WFH ने शेअर मार्केटला नवीन गुंतवणूकदार दिले, दोन वर्षांत दुप्पट झाली डिमॅट अकाऊंट

 

CBI Mumbai Recruitment 2022 | सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन मुंबई इथे ‘या’ पदासाठी भरती; जाणून घ्या

 

NCP-Shiv Sena | राष्ट्रवादी-शिवसेनाच्या नेत्यांमध्ये हमरीतुमरी? राष्ट्रवादीचे आमदार म्हणाले – ‘मला हात लावायचा नाही’; शिवसेना नेत्यानं म्हटलं – ‘पटत नाही, तर मग कशाला…’