LIC Jeevan Pragati Scheme | रोज 200 रुपये वाचवल्यास होईल 28 लाखांचा फायदा, जाणून घ्या LIC च्या ‘या’ योजनेची वैशिष्ट्ये

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – LIC Jeevan Pragati Scheme | जर तुम्ही सुद्धा LIC च्या एखाद्या पॉलिसीत गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर या प्लानबाबत जाणून घेणे आवश्यक आहे. आपण एलआयसीच्या एका (LIC Jeevan Pragati Scheme) अशा प्लानबाबत जाणून घेणार आहोत, ज्यामध्ये 200 रुपये रोज गुंतवून 20 वर्षानंतर 28 लाख रुपयांचा मोठा फंड तयार करू शकता. या पॉलिसीचे वैशिष्टय हे आहे की, यामध्ये 15,000 रुपयांपेक्षा जास्त पेन्शनसुद्धा दिली जाते. या प्लानबाबत सविस्तर जाणून घेवूयात.

 

LIC Jeevan Pragati Scheme :
LIC च्या या प्लानचे नाव जीवन प्रगती योजना (Jeevan Pragati Scheme) आहे. या पॉलिसीमध्ये जेवढा सम अ‍ॅश्युर्ड घेता, तेवढी त्यामध्ये वाढ होते आणि पॉलिसीच्या अखेरीस सम अ‍ॅश्युर्ड जवळपास दुप्पट वाढतो. ही एक नॉन लिंक्ड पॉलिसी आहे.

 

जाणून घ्या पॉलिसीचे फायदे :

या प्लानमध्ये कमी काळात गुंतवणूक करून पॉलिसीधारकाला अनेक फायदे मिळतात.

हा एंडोमेंट प्लान आहे, जो एकाच वेळी सुरक्षेसह बचत सुद्धा प्रदान करतो.

पॉलिसीमध्ये दर पाच वर्षात रिस्क कव्हर वाढते.

पहिली पाच वर्ष सम इन्श्युर्ड तेवढाच राहाते.

यानंतर 6 ते 10 वर्षापर्यंत तो 25% ने वाढून 125% होतो.

11 ते 15 वर्षासाठी सम इन्श्युर्ड 150% होतो.

16 ते 20 वर्षासाठी सम इन्श्युर्ड बेसिक सम इन्श्युर्डच्या 200% होतो.

मृत्यु लाभ :
जर पॉलिसी कालावधीत पॉलिसी धारकाचा मृत्यू झाला तर त्याच्या नॉमिनीला मृत्यूवर विमा रक्कम + सिम्पल रिव्हर्सनरी बोनस (जमा बोनस) + फायनल अ‍ॅडीशन बोनस (जर काही असेल तर) दिले जाते.

 

असे मिळतील 28 लाख रुपये :
या प्लॅन अंतर्गत 15 लाखाचा सम अश्युअर्ड आणि 200 रुपये रोजच्या गुंतवणुकीवर तुम्हाला 20 वर्षानंतर सुमारे 28 लाख रुपयांचा फंड मिळेल. यामध्ये कमी किंवा जास्त होऊ शकतो.

 

एलआयसी जीवन प्रगती योजनेच्या अटी :

वय : 12 ते 45 वर्ष

पॉलिसी कालावधी : 12 ते 20 वर्ष

मॅच्युरिटीचे कमाल वय : 65 वर्ष

कव्हर रक्कम किमान 1,50,000 रुपये

कमाल मर्यादा नाही

 

एलआयसी जीवन प्रगती योजनेत सरेंडर व्हॅल्यू :
जर पॉलिसीधारकाने 3 वर्षापर्यंत प्रीमियम भरला असेल तर तो पॉलिसी सरेंडर करू शकतो आणि सरेंडर मुल्य प्राप्त करू शकतो.

 

Web Title :- daily 200 rupees invest in lic policy get rs 28 lakh benefits know how LIC Jeevan Pragati Scheme

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Former MLA Mohan Joshi | शेतकऱ्यांच्या लढ्याचा विजय अन् PM मोदींच्या अहंकाराचा पराभव – माजी आमदार मोहन जोशी

Vikram Gokhale | ‘त्या’ मुलीची अन् माझी ओळख नाही, पण…’ – विक्रम गोखले

Chandrakant Patil | ‘कृषी कायदे पुन्हा आणण्यासाठी मी मोदींना विनंती करणार’ – चंद्रकांत पाटील