LIC ची खास योजना : फक्त एकदा पैसे भरा अन् आयुष्यभर दरमहा 8000 रुपये मिळवा, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   सध्याच्या काळात सुरक्षित भविष्यासाठी जीवन विमा हा खूप महत्त्वाचा आहे. आयुर्विमा क्षेत्रातील भारतीय जीवन विमा कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (LIC) ग्राहकांसाठी नेहमीच खास योजना आणत असते. आताही LIC ने जीवन शांती ही योजना आणली असून यात मिळणारे पेन्शन ही या पॉलिसीची विशेष बाब आहे. ही पॉलिसी ग्राहकांना पेन्शनद्वारे भविष्यात सुरक्षा प्रदान करते. LIC जीवन शांती एक व्यापक वार्षिक योजना आहे, ज्यात व्यक्ती आणि त्याच्या कुटुंबियांनाही लाभ मिळणार आहे.

या पॉलिसीमध्ये 45 वर्षीय व्यक्तीने 10,00,000 रुपये पॉलिसीमध्ये लावल्यास त्याला 74,300 वार्षिक पेन्शन मिळेल. ग्राहकाकडे 5, 10,15 किंवा 20 वर्षानंतर पेन्शन सुरू करण्याचा पर्याय आहे. 5, 10,15 किंवा 20 वर्षाच्या पर्यायात पेन्शनची रक्कम वाढेल, परंतु यासह काही नियम-अटीही आहेत. LIC ची जीवन शांती योजना एक नॉन लिंक्ड प्लॅन आहे. ही योजना ऑनलाईन आणि ऑफलाईनद्वारेही खरेदी करता येते.

LIC ची ही योजना कमीत-कमी 30 वर्ष आणि अधिकाधिक 85 वर्षापर्यंतचे व्यक्ती घेऊ शकतात. हा सिंगल प्रीमियम डिपॉझिट पेन्शन प्लॅन आहे. तसेच या योजनेत लोनची सुविधा देखील आहे. त्वरित किंवा 1 ते 20 वर्षांपर्यंत कधीही पेन्शनची सुरुवात करता येते. 10 लाखांच्या गुंतवणूकीवर 5 वर्षांनंतर पेन्शन सुरू केल्यास, यावर 9.18 टक्के रिटर्नच्या हिशोबाने वार्षिक पेन्शन मिळते. तात्काळ आणि स्थगित वार्षिक दोन्ही पर्यायांसाठी पॉलिसी घेताना वार्षिक दराची गॅरंटी दिली जाते. योजनेंतर्गत एकदा निवडलेला पर्याय बदलला जाऊ शकत नाही. ही योजना LIC च्या जुन्या जीवन अक्षय प्लॅनप्रमाणे आहे.