LIC Jeevan Shiromani | ‘एलआयसी’चा सुपरहिट प्लान! केवळ 4 वर्षांपर्यंत द्यावा लागेल प्रीमियम, मिळेल 1 कोटी रुपयांचा फायदा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – LIC Jeevan Shiromani | शेअर मार्केटमध्ये भरपूर कमाई आहे, पण जर तुम्हाला अशा ठिकाणी गुंतवणूक करायची असेल जिथे तुमचे पैसे सुरक्षित असतील आणि नफाही चांगला असेल, तर तुमच्यासाठी जीवन शिरोमणी योजना (LIC Jeevan Shiromani) हा एक चांगला पर्याय आहे. या योजनेत तुम्हाला 1 रुपयाच्या बदल्यातही मोठा नफा मिळेल. ही पॉलिसी संरक्षण तसेच बचत देते, याबाबत जाणून घेवूयात…

 

1 कोटी रुपयांची हमी रक्कम
वास्तविक, LIC ची योजना (Jeevan Shiromani Plan Benefits) ही एक नॉन-लिंक योजना आहे. यामध्ये तुम्हाला किमान 1 कोटी रकमेची हमी मिळते. एलआयसी आपल्या ग्राहकांना त्यांचे जीवन सुरक्षित करण्यासाठी अनेक चांगल्या पॉलिसी देत असते. या पॉलिसीमध्ये किमान परतावा 1 कोटी रुपये आहे. म्हणजेच, जर तुम्ही 14 वर्षांसाठी एक रुपया जमा केला तर तुम्हाला एकूण एक कोटीपर्यंत रिटर्न मिळेल.

 

काय आहे पूर्ण योजना?
एलआयसीच्या Jeevan Shiromani (टेबल क्र. 847) ने ही योजना 19 डिसेंबर 2017 रोजी सुरू केली होती. ही एक नॉन-लिंक, मर्यादित प्रीमियम पेमेंट मनी बॅक योजना आहे. ही बाजाराशी संबंधित लाभ योजना आहे.

 

ही योजना खास HNI (हाय नेट वर्थ व्यक्ती) साठी बनवली आहे. ही योजना गंभीर आजारांसाठी देखील संरक्षण प्रदान करते. यामध्ये 3 ऑप्शनल रायडर्स देखील उपलब्ध आहेत. (LIC Jeevan Shiromani)

मिळेल आर्थिक पाठबळ
जीवन शिरोमणी योजना, पॉलिसीधारकाचा पॉलिसीच्या मुदतीदरम्यान मृत्यू लाभाच्या रूपात कुटुंबाला आर्थिक सहाय्य प्रदान करते. या पॉलिसीमध्ये, पॉलिसीधारक जिवंत राहिल्यास निश्चित कालावधीत पैसे भरण्याची सुविधा देण्यात आली आहे. याशिवाय मॅच्युरिटीवर एकरकमी रक्कमही दिली जाते.

 

सर्व्हायव्हल बेनिफिट पहा
सर्व्हायव्हल बेनिफिट म्हणजेच पॉलिसीधारकांच्या जिवंत राहिल्यास निश्चित पेआउट केले जाते. या अंतर्गत, ही पेमेंट प्रक्रिया आहे.

1. 14 वर्षांची पॉलिसी – 10 व्या आणि 12 व्या वर्षी विम्याच्या रकमेच्या 30-30%.

2. 16 वर्षांची पॉलिसी – 12 व्या आणि 14 व्या वर्षी विम्याच्या रकमेच्या 35-35%.

3. 18 वर्षांची पॉलिसी – 14व्या आणि 16व्या वर्षी विम्याच्या रकमेच्या 40-40%.

4. 20 वर्षांची पॉलिसी – 16व्या आणि 18व्या वर्षात विम्याच्या रकमेच्या 45-45%.

 

किती मिळेल कर्ज
या पॉलिसीचे वैशिष्ट्य म्हणजे पॉलिसीच्या मुदतीदरम्यान, ग्राहक पॉलिसीच्या सरेंडर मूल्याच्या आधारे कर्ज घेऊ शकतो. पण हे कर्ज फक्त एलआयसीच्या अटी आणि शर्तीवरच मिळेल. पॉलिसी कर्ज वेळोवेळी ठरवल्या जाणार्‍या व्याजदरावर उपलब्ध असेल.

 

नियम आणि अटी
1. किमान विमा रक्कम – रु 1 कोटी

2. कमाल विमा रक्कम : कोणतीही मर्यादा नाही (मूलभूत विमा रक्कम 5 लाखांच्या पटीत असेल.)

3. पॉलिसी टर्म : 14, 16, 18 आणि 20 वर्षे

4. केव्हापर्यंत प्रीमियम भरावा लागेल : 4 वर्षे

5. प्रवेशासाठी किमान वय : 18 वर्षे

6. प्रवेशासाठी कमाल वय : 14 वर्षांच्या पॉलिसीसाठी 55 वर्षे; 16 वर्षांच्या पॉलिसीसाठी 51 वर्षे; 18 वर्षांच्या पॉलिसीसाठी 48 वर्षे; 20 वर्षांच्या पॉलिसीसाठी 45 वर्षे.

 

 

Web Title :- LIC Jeevan Shiromani | lic superhit scheme lic shiromani policy lics plan is getting the benefit of rupees 1 crore know here how

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ajit Pawar | राष्ट्रवादी पक्षाला गल्लीतला पक्ष म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना अजित पवारांचं उत्तर; म्हणाले…

 

Pune Weekend Lockdown | ‘पुण्यात विकेंड लॉकडाऊनचा निर्णय शुक्रवारी’ – उपमुख्यमंत्री अजित पवार (Video)

 

Ajit Pawar | ‘राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच, ‘आदित्य’ हा शब्द मागे घेतो’ – अजित पवारांचं स्पष्टीकरण