LIC Jeevan Tarun Policy | रोज 150 रुपये जमा करून तुम्ही मुलासाठी बनवू शकता 8.5 लाखांचा फंड

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – LIC Jeevan Tarun Policy | तुम्हाला वाटत असेल की तुमचे मूल 25 वर्षांचे झाल्यावर, त्याच्याकडे खर्चासाठी भरीव ठेव असावी, तर तुम्ही आतापासून एलआयसी जीवन तरुण पॉलिसी (LIC Jeevan Tarun Policy) मध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात करावी. एलआयसी (LIC) हे भारतातील विश्वासाचे दुसरे नाव मानले जाते. यामध्ये केलेली तुमची गुंतवणूक केवळ पूर्णपणे सुरक्षित नाही तर एलआयसीची पॉलिसी मोठा निधी तयार करण्यात मदत करते.

 

जीवन तरुण पॉलिसी ही एक भागीदारी पूर्ण, नॉन-लिंक्ड लिमिटेड प्रीमियम पेमेंट प्लान आहे. मुलांचे शिक्षण आणि इतर गरजा लक्षात घेऊन ही योजना करण्यात आली आहे. यामध्ये मुलांना बचत आणि विमा संरक्षण या दोन्हींचा लाभ मिळतो. यात तुम्ही मुलांच्या शिक्षणाचा आणि लग्नाचा खर्च भागवू शकता.

 

गुंतवणुकीसाठी वय
एलआयसीच्या जीवन तरुण पॉलिसीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी, मुलाचे वय 90 दिवसांच्या दरम्यान म्हणजेच 3 महिने ते 12 वर्षे असावे. तुमच्या घरात या वयोगटातील मूल असेल तर तुम्ही त्याच्यासाठी गुंतवणुकीचे नियोजन करू शकता. (LIC Jeevan Tarun Policy)

 

पॉलिसीमध्ये आहेत चार पर्याय
हा एक लवचिक प्लान आहे, ज्यामध्ये सर्व्हायव्हल बेनिफिटचा पर्याय पॉलिसीच्या मुदतीदरम्यान प्रस्तावाच्या टप्प्यावर निवडता येतो. पॉलिसीधारकाने पहिला पर्याय निवडल्यास, त्याला/तिला कोणताही सर्व्हायव्हल लाभ मिळत नाही आणि 100% विम्याची रक्कम मिळते.

 

दुसरीकडे, दुसर्‍या पर्यायामध्ये, 5 वर्षांसाठी 5% ची विमा रक्कम दरवर्षी आणि मॅच्युरिटीवर 75% सम अ‍ॅश्युअर्ड मिळते. तिसर्‍या पर्यायामध्ये, दरवर्षी 10% सम अ‍ॅश्युअर्ड आणि मॅच्युरिटीवर 50% सम अ‍ॅश्युअर्ड मिळते.

 

त्याचप्रमाणे, चौथा पर्याय निवडल्यावर, पॉलिसीधारकाला 5 वर्षांसाठी दरवर्षी 15% सम अ‍ॅश्युअर्ड आणि मॅच्युरिटीवर 25% सम अ‍ॅश्युअर्ड मिळते.

मॅच्युरिटी पीरियड
मूल 25 वर्षांचे झाल्यावर एलआयसीची जीवन तरुण पॉलिसी मॅच्युअर होते.
पॉलिसी घेताना मुलाचे वय 10 वर्षे असल्यास, पॉलिसी 15 वर्षांनी मॅच्युअर होईल.
तुम्ही तुमच्या गरजेनुसार या योजनेत गुंतवणूक करू शकता. मूल 20 वर्षांचे होईपर्यंत तुम्हाला प्रीमियम भरावा लागेल.
यानंतर, जेव्हा मूल 25 वर्षांचे होईल, तेव्हा तुम्हाला मॅच्युरिटी रक्कम मिळेल.

 

दररोज 150 रुपये गुंतवा, मिळतील 8.5 लाख
या पॉलिसी अंतर्गत प्रीमियम पेमेंट सुरू करताना तुमच्या मुलाचे वय 12 वर्षे असल्यास,
किमान 5 लाख रुपयांच्या विमा रकमेसह पॉलिसीची टर्म 13 वर्षे असेल.

 

जर दिवसाला 150 रुपये वाचवले तर तुमचा वार्षिक प्रीमियम सुमारे 55,000 रुपये असेल.
आठ वर्षांत तुमची एकूण गुंतवणूक 4,40,665 होईल. यावर तुम्हाला 2,47,000 रुपयांचा बोनस मिळेल.
त्याच वेळी, विमा रक्कम 5 लाख रुपये होईल.

 

याशिवाय 97,500 रुपयांचा लॉयल्टी बेनिफिट मिळेल. अशा प्रकारे तुम्हाला एकूण 8,44,500 रुपये मिळतील.

 

Web Title :- LIC Jeevan Tarun Policy | lic jeevan tarun policy for children get more than rs 8 lakh return at maturity if you invest rs 150 daily

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Changes From July 1 | क्रिप्टोकरन्सी, पॅन-आधार लिंक, प्लास्टिक बॅन आणि नवीन कामगार कायदा…जाणून घ्या 1 जुलैपासून होणार कोण-कोणते बदल

 

Eknath Shinde CM |  … म्हणून भाजपने एकनाथ शिंदेंच्या हाती दिली सत्तेची सूत्रं, ‘ही’ आहेत 4 कारणे

 

Gold Silver Price Today | सोने 51 हजारच्या खाली आले, चांदीत झाली मोठी घसरण, जाणून घ्या नवीन दर