LIC Jeevan Umang Policy | LIC च्या या योजनेत दरमहिना 1302 रुपयांची गुंतवणूक तुम्हाला देऊ शकते 27 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – LIC Jeevan Umang Policy | भारतीय आयुर्विमा महामंडळ लोकांसाठी अनेक योजना आणते. ज्यामध्ये लोकांना विम्यासह पैसा जमवण्याची सुद्धा संधी दिली जाते. सोबतच एलआयसीची पॉलिसी तुम्हाला सुरक्षा सुद्धा देते. अशीच एलआयसीची एक पॉलिसी जीवन उमंग प्लान (LIC Jeevan Umang Policy) आहे, ज्यामध्ये गुंतवणूक करून एक मोठा नफा मिळवता येऊ शकतो.

 

या योजनेत कॅलक्युलेशनच्या आधारावर पाहले तर तुम्ही 1300 रुपयांची प्रत्येक महिन्याची बचत करून 28 लाखापर्यंत रक्कम जमवू शकता. या स्कीमबाबत जाणून घेवूयात सविस्तर…

 

LIC जीवन उमंग पॉलिसी
या पॉलिसीचे वैशिष्ट्य हे आहे की ती कुणीही भारतीय नागरिक घेऊ शकतो, ज्याचे वय 90 दिवसांपासून 55 वर्षापर्यंत आहे. हा एक एंडोमेंट प्लान आहे, ज्यामध्ये लाईफ कव्हरसह मॅच्युरिटीवर एकरकमी पैसे दिले जातात. या योजनेत जर मॅच्युरिटी पूर्ण झाली तर फिक्स्ड इन्कम दरवर्षी तुमच्या खात्यात येत राहते. (LIC Jeevan Umang Policy)

 

मात्र, ही रक्कम एका निश्चित कालावधीदरमयान खात्यात पोहचते. परंतु जर पॉलिसी धारकाचा मृत्यू झाला तर त्याच्या नॉमिनीला एकरकमी पैसे दिले जातात. या योजनेचे आणखी एक वैशिष्ट्य हे आहे की यामध्ये 100 वर्षापर्यंत कव्हरेज मिळते.

पॉलिसीचे फायदे
पॉलिसीधारकाचा दुर्घटनेत मृत्यू झाल्यास किंवा अपंग झाल्यास टर्म रायडरचा सुद्धा लाभ मिळतो.
बाजार जोखमीचा पॉलिसीवर काहीही परिणाम होत नाही. या पॉलिसीवर LIC च्या नफा आणि तोट्याचा आवश्यक परिणाम होतो.
इन्कम टॅक्सच्या सेक्शन 80सी अंतर्गत पॉलिसी घेतल्यास टॅक्स सवलत मिळते.
जीवन उमंग पॉलिसी (Jeevan Umang Policy) चा प्लान घ्यायचा असेल तर किमान दोन लाख रुपयांचा विमा घ्यावा लागेल.

 

इतकी मिळेल रक्कम
LIC Jeevan Umang मध्ये दरमहिना 1302 रुपयांचा प्रीमियम भरला तर एक वर्षात ही रक्कम 15,298 रुपये होते.
जर पॉलिसी 30 वर्षापर्यंत सुरू ठेवली तर रक्कम वाढून सुमारे 4.58 लाख रुपये होते.
तुमच्या गुंतवणुकीवर कंपनी 31व्या वर्षापासून 40 हजार दरवर्षी रिटर्न देण्यास सुरू करते.
31 व्या वर्षापासून 100 वर्षापर्यंत 40 हजार वार्षिक रिटर्न घेतला तर सुमारे 27.60 लाख रुपये मिळतील.

 

Web Title :- LIC Jeevan Umang Policy | lic jeevan umang policy an investment of rs 1302 every month can give you an amount of more than rs 27 lakh

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Winter Diet Chart | हिवाळ्यात कसा असावा डाएट चार्ट, जाणून घ्या सविस्तर

Diabetes & Egg | डायबिटीजच्या रुग्णांनी अंडे खावे का? जाणून घ्या तत्ज्ञांचा सल्ला

Diabetes – High Blood Sugar Level | डायबिटीजच्या रूग्णांमध्ये पपई खाल्ल्याने वाढू शकते का ब्लड शुगर? जाणून घ्या काय आहे सत्य