LIC Kanyadaan Policy | ‘एलआयसी’च्या कन्यादान पॉलिसीत रोज जमा करा 130 रुपये, मॅच्युरिटीवर मिळतील 27 लाख रुपये; जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली : वृत्त संस्था – LIC Kanyadaan Policy | भारतीय आयुर्विमा महामंडळ (Life Insurance Corporation of India) ही देशातील सर्वात मोठी आणि जगातील तिसरी सर्वात मोठी विमा कंपनी आहे. देशवासीयांची गरज लक्षात घेऊन LIC वेळोवेळी पॉलिसी लाँच करते. अशीच एक पॉलिसी भारतीय आयुर्विमा महामंडळाने मुलींसाठी सुरू केली होती, तिचे नाव कन्यादान पॉलिसी (LIC Kanyadaan Policy) आहे.

एलआयसीच्या या पॉलिसीमध्ये, तुम्ही तुमच्या मुलीचा जन्म होताच लग्नासाठी पैसे जमा करण्यास सुरूवात करू शकता आणि जेव्हा मुलीचे वय लग्न करण्यायोग्य होईल, तेव्हा तुम्हाला मॅच्युरिटीवर 27 लाख रुपयांपर्यंत रक्कम मिळू शकते. एलआयसीच्या कन्यादान पॉलिसीबद्दल जाणून घेवूयात…

किती भरावा लागेल प्रीमियम –

तुम्ही एलआयसीच्या कन्यादान पॉलिसीमध्ये दररोज 130 रुपये गुंतवल्यास ते वार्षिक 47,450 रुपये होतील. या पॉलिसीमध्ये, गुंतवणूकदाराला मॅच्युरिटीच्या तीन वर्षांपूर्वी पर्यंत प्रीमियम भरावा लागेल. (LIC Kanyadaan Policy)

त्यानंतर पॉलिसीमध्ये एक रुपयाही गुंतवण्याची गरज नाही. 25 वर्षांनंतर कन्यादान पॉलिसीच्या मॅच्युरिटीवर, तुम्हाला 27 लाख रुपयांपर्यंतची रक्कम दिली जाते. त्याच वेळी, पैशाची गरज भासल्यास ही पॉलिसी 13 वर्षांत मुदतीपूर्वी बनवली जाऊ शकते.

कन्यादान पॉलिसीचे फायदे –

एलआयसीच्या या पॉलिसीमध्ये, कोणत्याही कारणामुळे वडिलांचा किंवा पालकाचा अपघाती मृत्यू झाल्यास, एलआयसीकडून एकरकमी 10 लाख रुपये दिले जातात. त्याचबरोबर पॉलिसीच्या प्रीमियममध्येही सूट देण्यात आली आहे.

जर मृत्यू साध्या कारणाने झाला असेल तर एकरकमी 5 लाख रुपये आणि 50,000 रुपये दरवर्षी दिले जातात. तसेच, मुदतपूर्तीनंतर पूर्ण पैसे दिले जातात. यासोबतच, या पॉलिसीमधील प्राप्तीकर कलम 80सी अंतर्गत, एक लाख 50 हजार रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर कर सवलत उपलब्ध आहे.

 

कोण घेऊ शकतात कन्यादान पॉलिसी –

भारतीय आयुर्विमा महामंडळाची कन्यादान पॉलिसी 18 ते 50 वर्षे वयोगटातील वडील आपल्या मुलीसाठी घेऊ शकतात.
त्याचबरोबर या धोरणानुसार मुलीचे वय 1 ते 10 वर्षांच्या दरम्यान असावे.
जर हे दोन्ही निकष पूर्ण झाले तर तुम्ही एलआयसीची कन्यादान पॉलिसी घेऊ शकता.

कन्यादान पॉलिसीसाठी या कागदपत्रांची आवश्यक –

एलआयसीची कन्यादान पॉलिसी घेण्यासाठी अर्जदाराकडे आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, ओळखपत्र,
मुलीचा जन्म दाखला यासारखी महत्त्वाची कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
या कागदपत्रांच्या आधारे अर्जदाराला एलआयसीच्या कन्यादान पॉलिसीचा लाभ मिळतो.

Web Title :- LIC Kanyadaan Policy | deposit rs 130 daily in lic kanyadan policy rs 27 lakh
will be available on maturity

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | खळबळजनक! उरुळी कांचन येथे सापडले छाटलेल्या मृतदेहाचे शीर व हाताचा भाग

 

Brata Virus Alert For Android | केवळ एका चुकीने रिकामे होईल बँक खाते, Android यूजर्सला घाबरवण्यासाठी आला BRATA Virus

 

ST Workers Strike | एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच राहणार, विलीनीकरणाबाबत मोठी माहिती आली समोर