LIC कन्यादान पॉलिसी : जमा करा केवळ 130 रुपये, मुलीच्या लग्नासाठी मिळतील पूर्ण 27 लाख, जाणून घ्या कसे?

नवी दिल्ली : वृत्त संस्था – Kanyadan policy – मुलींचा जन्म होताच आई-वडील त्यांच्या चांगल्या भविष्यासाठी पैशांची बचत करण्यास सुरूवात करतात. यासाठी चांगली अन्व्हेस्टमेंट पॉलिसी घेण्याचे प्लॅनिंग करतात, जेणेकरून मुलीचे शिक्षण आणि विवाहात कोणतीही अडचण येऊ नये. भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIC) मुलींना लक्षात घेऊन खास स्कीम आणली आहे. तिचे नाव आहे – LIC कन्यादान पॉलिसी.(Kanyadan policy ) एलआयसीची ही स्कीम कमी उत्पन्न असलेल्या आई-वडीलांना मुलीच्या विवाहासाठी पैसे जमवण्यात मदत करते.

अशी आहे पॉलिसी
एलआयसी कन्यादान पॉलिसी ( Kanyadan policy ) अंतर्गत एका गुंतवणुकदाराला रोज 130 रुपये (47,450 रुपये वार्षिक) जमा करावे लागतील. पॉलिसी कालावधी 3 वर्षापेक्षा कमी काळासाठी प्रीमियम भरला जाईल. 25 वर्षानंतर, एलआयसी त्यास सुमारे 27 लाख रुपये देईल. एलआयसी कन्यादान पॉलिसी ( Kanyadan policy ) मध्ये नोंदणीसाठी गुंतवणुकदाराचे किमान वय 30 वर्ष आहे आणि गुंतवणुकदाराच्या मुलीचे किमान वय 1 वर्ष असावे.

या पॉलिसीचा मिनिमम मॅच्योरिटी पीरियड 13 वर्ष आहे. जर काही कारणामुळे विमित व्यक्तीचा मृत्यू झाला तर एलआयसीकडून व्यक्तीला अतिरिक्त 5 लाख रुपये द्यावे लागतील. कुणी व्यक्तीने 5 लाख रुपयांचा विमा घेतला तर त्यास 22 वर्षापर्यंत मासिक हप्ता 1,951 रुपये द्यावा लागेल. कालावधी पूर्ण झाल्यानंतर एलआयसीकडून 13.37 लाख रुपये मिळतील. अशाच प्रकारे जर कुणी व्यक्तीने 10 लाखांचा विमा घेतला तर त्यास महिन्याला 3901 रुपये हप्ता भरावा लागेल. 25 वर्षानंतर एलआयसीकडून 26.75 लाख रुपये मिळतील.

टॅक्समध्ये मिळेल सूट
प्राप्तीकर कायदा 1961 चे कलम 80सी अंतर्गत, एक गुंतवणुकदार भरलेल्या प्रीमियमवर सवलतीचा दावा करू शकतो. कर सवलत कमाल 1.50 लाख रुपयांपर्यंत आहे. या स्कीमसाठी अर्ज करण्यासाठी आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, ओळखपत्र, जन्म दाखला ही कागदपत्र आवश्यक आहे.

दुसर्‍या खुनातून पहिल्या खुनाचा झाला ‘उलघडा’ ! 2 खुन, एक मृत्यु आणि एका आत्महत्येला ठरला ‘तो’ कारणीभूत

भाडेकरूंसाठी खुशखबर ! 2 महिन्यांपेक्षा अधिक जास्तीचं भाडे घेता येणार नाही, नव्या घरभाडे कायद्यामध्ये घरमालक

बदलापूरातील केमिकल कंपनीतून वायू गळती; 3 किमी परिसरातील नागरिकांना झाला श्वसनाचा त्रास

Petrol-Diesel Price Today : पेट्रोल-डिझेलने मोडले सर्व विक्रम, सतत होतेय महाग, जाणून घ्या आजचे दर

Coronavirus In India Updates : लागोपाठ कमी होत आहेत केस, देशात कोरोनाची 1.31 लाख नवी प्रकरणे, 2,706 लोकांचा मृत्यू

ईस्ट इंडिया कंपनी प्रमाणे वागू शकत नाही इंटरनेट मीडिया : केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद

गरीब आणि वंचितांसाठी चालणार मोदी सरकारचे विशेष अभियान, बनवणार 2 कोटी रेशन कार्ड; जाणून घ्या