LIC Policy : दररोज फक्त 125 रुपयांची बचत करा अन् मुलीच्या लग्नासाठी मिळवा 27 लाख रुपये, सोबतच ‘हे’ मोठे फायदे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुलीच्या लग्नाची चिंता करणा-यांसाठी एलआयसीने (LIC) खास कन्यादान ही विमा पॉलिसी तयार केलेली आहे. या पॉलिसीला (LIC Policy)  नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यामुळे आई-वडिलांना रोख रक्कम मिळणे सोपे झाल्याने मुलीच्या लग्नासाठी हातभार लागण्यास मदत होत आहे.

पॉलिसी काय?
कन्यादान पॉलिसीमध्ये आई आणि वडिलांना बचत करण्याची चांगली संधी मिळते. या पॉलिसी अंतर्गत फिक्स्ड इन्कम सोबतच ठेवीच्या सुरक्षेचीही हमी दिली जाते. रोज 125 रुपये जमा केल्यानंतर विमाधारकांना भविष्यात 27 लाख मिळतात. ही पॉलिसी 25 वर्षांसाठी आहे. मात्र असे असले तरी विमाधारकाला फक्त 22 वर्षापर्यंतच प्रिमियम भरावा लागणार आहे. त्यानंतर पुढचे तीन वर्षे कुठलेही प्रिमियम भरण्याची गरज नाही. तसेच विमाधरकाचा अचानक मृत्यू झाल्यानंतर त्याच्या परिवाराला कोणताही प्रिमियम भरण्याची गरज नाही.

काय आहे अट ?
या पॉलिसी अंतर्गत गुंतवणूक करायची असेल तर वय कमीतकमी 30 वर्षे असणे बंधनकारक आहे. तसेच मुलीचे वय कमीतकमी 1 वर्ष असणे गरजेचे आहे. मुलीचे वय जेवढे जास्त असेल तेवढी या पॉलिसीची कालमर्यादा कमी होईल. ग्राहकांना परवडेल असे आकर्षक प्रिमियम या पॉलिसामध्ये उपलब्ध आहेत.

पॉलिसीचे फायदे काय?
– अपघातात मृत्यू झाल्यानंतर परिवाराला 20 लाख रुपये मिळणार.
– पॉलिसीदरम्यान विनाधारकाचा मृत्यू झाल्यास परिवाराला 10 लाख रुपये मिळणार.
-3 वर्षे प्रिमियम भरल्यानंतर विमाधारकाला या पॉलिसीवर कर्ज घेता येईल.