फक्त 121 रूपये जमा करून मुलीच्या लग्नासाठी जमा करा पैसे, LIC च्या ‘या’ पॉलिसीमधून मिळतील 21 लाख

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – LIC ने मुलींच्या लग्नासाठी खास ‘कन्यादान योजना’ पॉलिसी तयार केली आहे. या योजनेत दररोज 121 रुपये याप्रमाणे महिन्याला 3600 रुपयांच्या प्रीमियमवर ही पॉलिसी मिळते.

कन्यादान पॉलिसीत दररोज 121 रुपयांप्रमाणे पैसे भरल्यास 25 वर्षांनी 27 लाख रुपये मिळतील. याशिवाय पॉलिसी घेतल्यानंतर जर मृत्यू झाला तर कुटुंबाला प्रीमियम भरावा लागणार नाही आणि दरवर्षी एक लाख रुपयेही दिले जातात. तसेच 25 वर्ष पूर्ण झाल्यावर वारसांना 27 लाख रुपये मिळतात.

वयाची अट –

LIC ची ही पॉलिसी घेणाऱ्यांचं कमीत कमी 30 वर्ष वय आणि मुलीचे वय 1 वर्ष असावे. ही पॉलिसी 25 वर्षांसाठी असली तरी प्रीमियम फक्त 22 वर्ष भरावा लागेल. पॉलिसी घेणाऱ्याच्या आणि मुलीच्या वयानुसारदेखील पॉलिसी मिळते. मुलीच्या वयानुसार पॉलिसीची मुदत कमी केली जाऊ शकते.

पॉलिसी विषयी
पॉलिसी 25 वर्षांसाठी घेतली जाऊ शकते.
प्रीमियम 22 वर्षांसाठी भरावा लागतो.
दिवसाला 121 रुपये किंवा महिन्यात सुमारे 3600 रुपये.
विमाधारकाचा अचानक मृत्यू झाल्यास कुटुंबाला कोणतेही प्रीमियम द्यावे लागणार नाहीत.
पॉलिसीच्या उर्वरित वर्षात मुलीला दरवर्षी 1 लाख रुपये मिळतील.
पॉलिसी पूर्ण झाल्यावर वारसदार व्यक्तीला 27 लाख रुपये मिळतील.
ही पॉलिसी कमी-अधिक प्रीमियमसाठी देखील घेतले जाऊ शकते.

Visit : Policenama.com