LIC Kanyadan Policy | दररोज वाचवा 130 रुपये, 25 वर्षानंतर मिळतील 27 लाख, जाणून घ्या काय आहे प्लान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – LIC Kanyadan Policy | तुम्हाला मुलीच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी पैसे (girl child investment scheme) गोळा करायचे असतील, तर भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LIC ची कन्यादान पॉलिसी यासाठी उपयुक्त ठरू शकते. एलआयसी कन्यादान पॉलिसीमध्ये, तुम्हाला दररोज फक्त 130 रुपये वाचवावे लागतील. म्हणजेच तुम्हाला एका महिन्यात 3900 रुपये वाचवावे लागतील. या बचतीतून तुम्ही 27 लाख रुपये जमा करू शकता. (LIC Kanyadan Policy)

 

LIC Kanyadan Policy ची खास बाब म्हणजे याद्वारे बचत होते, शिवाय प्राप्तीकरातही सूट मिळते. प्राप्तीकर कायद्याच्या कलम 80सी अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंत कर सूट मिळू शकते.

 

आयुर्विमा महामंडळाची (LIC) कन्यादान पॉलिसी ही मुलींसाठी अतिशय लोकप्रिय योजना आहे.

 

एलआयसी जीवन लक्ष्य पॉलिसी
एलआयसीची कन्यादान पॉलिसी ही जीवन लक्ष्य पॉलिसीची कस्टमाईज योजना आहे. विमा एजंट मुलीच्या लग्नासाठी ही योजना कस्टमाईज करून कन्यादान पॉलिसीच्या नावाने विकतात.

 

कसा घेऊ शकता प्लान
LIC ची कन्यादान पॉलिसी किंवा जीवन लक्ष्य योजना खरेदी करण्यासाठी आधार कार्ड, उत्पन्नाचा पुरावा, ओळखपत्र, पत्त्याचा पुरावा आणि पासपोर्ट आकाराचा फोटो आवश्यक आहे. अर्जासोबत मुलीच्या जन्म प्रमाणपत्रासह स्वाक्षरी केलेला अर्ज आणि पहिल्या प्रीमियमचा धनादेश द्यावा लागतो.

काय आहेत फायदे

एलआयसी कन्यादान पॉलिसीची मॅच्युरिटी 25 वर्षे आहे

प्रीमियम फक्त 22 वर्षांसाठी भरावा लागतो.

शेवटचे तीन वर्ष प्रीमियम भरावा लागणार नाही.

पॉलिसीची 25 वर्षे पूर्ण झाल्यानंतर 27 लाख रुपये दिले जातील.

वडिलांचा किंवा पालकाचा अपघाती मृत्यू झाला तर नॉमिनीला एकरकमी 10 लाख रुपये मिळतील.

पॉलिसी सुरू राहील आणि प्रीमियम पेमेंटमध्ये सूट मिळेल.

वडिलांचा किंवा पालकाचा मृत्यू सामान्य कारणाने झाल्यास 5 लाख रुपये एकरकमी मिळतात. त्यानंतर दरवर्षी 50 हजार रुपये दिले जातात.

मॅच्युरिटीनंतर पूर्ण पैसे दिले जातात.

या पॉलिसीमध्ये दरवर्षी जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये गुंतवले जाऊ शकतात.

LIC कन्यादान पॉलिसी 25 वर्षांऐवजी 13 वर्षांसाठी घेऊ शकता. लग्नाव्यतिरिक्त हा पैसा मुलीच्या शिक्षणासाठीही वापरता येईल.

 

पॉलिसी कोण घेऊ शकते
एलआयसी कन्यादान पॉलिसी 18 ते 50 वर्षे वयोगटातील वडील घेऊ शकतात. मुलीचे वय किमान 1 वर्ष असावे. ही योजना मुलीच्या वेगवेगळ्या वयानुसार देखील उपलब्ध होऊ शकते. मुलीच्या वयानुसार या पॉलिसीची कालमर्यादा कमी केली जाते. जर एखाद्या व्यक्तीला अधिक किंवा कमी प्रीमियम भरायचा असेल तर तो या योजनेत सहभागी होऊ शकतो.

 

फ्री लुक पीरियड
पॉलिसी धारकाला पॉलिसी सुरू झाल्याच्या तारखेपासून 15 दिवसांचा फ्री लुक पीरियड मिळतो. पॉलिसीधारक अटी व शर्तींबाबत समाधानी नसेल, तर तो पॉलिसीमधून बाहेर पडू शकतो.

 

या पॉलिसी अंतर्गत, वार्षिक, त्रैमासिक पेमेंटसाठी 30 दिवसांचा वाढीव कालावधी दिला जातो. मासिक पेमेंटच्या बाबतीत 15 दिवसांचा अतिरिक्त कालावधी आहे. तुम्ही 3 वर्षांसाठी प्रीमियम भरल्यानंतर पॉलिसी सरेंडर करू शकता.

 

Web Title :- LIC Kanyadan Policy | lic kanyadan policy insurance bima saving and investment plan for girl child

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या संख्येत वाढ, गेल्या 24 तासात 175 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Coronavirus in Maharashtra | चिंताजनक! राज्यात ‘कोरोना’ रुग्णसंख्येत मोठी वाढ, गेल्या 24 तासात 11,877 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Omicron Covid Variant | चिंताजनक राज्यात आज ओमिक्रॉनचे नवे 50 रूग्ण, पुण्यात सर्वाधिक 36