LIC Lapsed Policies | LIC च्या ‘या’ पॉलिसी होल्डर्ससाठी पुढील 7 दिवस महत्वाचे, होईल मोठा फायदा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – LIC Lapsed Policies | तुम्ही एलआयसीचे पॉलिसीधारक असाल आणि पॉलिसी लॅप्स किंवा बंद झाली असेल तर ही बातमी तुमच्या उपयोगाची आहे. खरं तर, एलआयसी लॅप्स झालेली किंवा बंद झालेली पॉलिसी पुन्हा चालू करण्याची संधी देत आहे. आता या संधीचा लाभ घेण्यासाठी फक्त 7 दिवस उरले आहेत.

 

म्हणजेच 25 मार्चपर्यंत तुम्ही तुमची बंद पडलेली किंवा लॅप्स झालेली पॉलिसी पुन्हा चालू करू शकता. पुन्हा सुरू झाल्यावर पॉलिसीधारकांना विलंब शुल्क माफी देखील दिली जाईल. हे अभियान एलआयसीने फेब्रुवारी महिन्यात सुरु केले होते.

 

कोणाला किती सूट :
एलआयसीनुसार, वार्षिक 1 लाख रुपयांच्या प्रीमियमच्या पॉलिसीवर 20 टक्के किंवा कमाल 2 हजार रुपयांची सूट मिळेल. त्याच वेळी, जर 1 लाख ते 3 लाख रुपयांच्या वार्षिक प्रीमियम पॉलिसीवर 25 टक्के किंवा कमाल 2,500 रुपयांची सूट दिली जाईल. यापेक्षा जास्त प्रीमियम असलेल्या पॉलिसीवर 30 टक्के किंवा कमाल 3,000 रुपयांची सूट मिळेल. (LIC Lapsed Policies)

 

या मोहिमेत त्या विमा उत्पादनांचा समावेश केला जाईल, जे पॉलिसीची मुदत पूर्ण करतात आणि प्रीमियम पेमेंटचे नियम पूर्ण करतात.

 

Web Title :- LIC Lapsed Policies | lic last chance to revive your lapsed policies upto 25 march check details here

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा