खुशखबर ! LIC ची एकदम फायद्याची पॉलिसी, 22 रूपयांची बचत करून मिळवा लाखो रूपये, मिळणार ‘हे’ 4 फायदे

नवी दिल्ली :वृत्तसंस्था – भारतीय जीवन विमा निगम म्हणजेच एलआयसीने भारतीयांसाठी नवीन योजना आणली असून ‘जीवन अमर असे या योजनेचे नाव आहे. या योजनेत तुम्हाला डेथ बेनिफिट्स ऑप्शंस, लेवल सम एश्योर्ड आणि इन्क्रीजिंग सम एश्योर्ड या तीनमधील कोणत्याही एका सुविधेचा फायदा घेता येतो.

हि योजना तुम्ही ऑफलाइन देखील खरेदी करू शकता. त्यामुळे कोणत्याही एलआयसीच्या एजंटमार्फत तुम्ही हि योजना घेऊ शकता. एलआयसीने आपला अमूल्य जीवन टर्म प्लॅन बंद केला असून या नवीन जीवन अमर योजनेत अनेक नवीन फीचर्स तुम्हाला फायदा मिळवून देणार आहेत.

या योजनेचे आहेत हे फायदे
१)
१० वर्षांपासून ४० वर्षांपर्यंत मुदत

जीवन अमर पॉलिसी हि यॊजना १८ ते ६५ वर्षीय व्यक्तिंसाठी लागू असून यामध्ये जास्तीत वयोमर्यादा हि ८० वर्ष आहे. या योजनेत तुम्ही १० वर्ष ते ४० वर्षांपर्यंतचे प्लॅन विकत घेऊ शकता.

२) हफ्ता भरण्यासाठी मिळणार पर्याय
जीवन अमर या एलआयसी पॉलिसीमध्ये तुम्हाला हफ्ता भरण्यासाठी तीन पर्याय उपलब्ध होणार आहेत. सिंगल प्रीमियम, रेग्युलर प्रीमियम और लिमिटेड प्रीमियम असे तीन पर्याय उपलब्ध करून दिले जाणार आहेत. रेग्युलर आणि लिमिटेड प्रीमियममध्ये तुम्हाला ३ हजार रुपयांचा हफ्ता मिळणार आहे तर सिंगल प्रीमियममध्ये तुम्हाला ३० हजार रुपयांचा हफ्ता भरावा लागणार आहे.

३) महिलांना मिळणार सूट
या योजनेत महिला आणि पुरुषांना हफ्त्याची रक्कम वेगवेगळी असणार आहे. त्यामुळे या योजनेत त्यांना कोणत्याही प्रकारची सरेंडर व्हॅल्यू मिळणार नाही.

४) धूम्रपान न करणाऱ्यांना कमी हफ्ता
या योजनेत धूम्रपान न करणाऱ्यांना हफ्त्यामध्ये सूट देण्यात येणार आहे. महिलांपेक्षा पुरुषांचा हफ्ता अधिक असणार आहे. त्याचबरोबर धूम्रपान करणाऱ्यांना इतरांपेक्षा अधिक हफ्ता भरावा लागणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –